पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिला व त्यांच्या साथीदाराने तीन लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्ररणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. यबाबत ६२ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या ३४ वर्षीय मुलाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. गुन्हा दाखल न करण्यासाठी ३ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच, त्यांच्याकडून पैसे घेतले. हा प्रकार जुलै २०२१ मध्ये घडला आहे.