चुरणी : बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राख्याची खरेदी विक्री सुरू झाली आहे. प्रत्येक राखी सणाला बहीणीची आपल्या भावाला वेगळी राखी बांधायची अशी इच्छा असते. अशातच काही नैसर्गिक साधनापासून बनवलेल्या बांबू राखीला मेळघाटातच (Melghat) नव्हे, तर बाहेर देशातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. २०१८ साली मेळघाटातील बांबू पासून बनवलेली राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधल्या (Prime Minister Narendra Modi) गेली होती. त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी आणि आयसीआर (ICR) यांच्या सहयोगाने विदेशातही राखी (Rakhi in abroad) पाठविण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आतापर्यंत ६०,००० राख्या जापान, अमेरिकेसह (Japan, America) अन्य ६० देशात पोहचविण्यात आल्या आहेत.
संपूर्ण बांबू केंद्राच्या संचालिका देशपांडे (Bamboo Center Director Deshpande) यांनी सांगितले की ऑनलाईन राख्याची (Rakhi online) मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नागपुरातही नागरिक जास्तीत जास्त ऑनलाईन राख्या मागवीत आहे. एका राखीची किंमत ३५ ते ५० रुपये पर्यंत आहे.
भावाचा फोटो असणाऱ्या राखीचे चलन मागील दोन वर्षांपासून सुरु झाले आहे. गुजरात व मुंबई (Gujarat and Mumbai) येथून या राख्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. यात लहान मुलांनाच नाही तर सर्वच वयोगटातील नागरिकांना सुद्धा फोटो वाल्या राखीची चटक लागली आहे. शहरात जवळपास सर्वच स्टुडिओ मध्ये या राख्या मिळत आहे. सिझन मध्ये ४०० पेक्षा जास्त राख्या एका स्टुडिओ मध्ये बनविल्या जातात. एका राखीची किंमत ७० ते १०० रुपये ऑफलाईन मिळते. तेच ऑनलाईन १५० ते २५० रुपयाला घ्यावी लागते.
मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी (remote tribes of Melghat) गावातील महिला राख्या बनविण्याच्या कामात जोडल्या गेली असून आता त्यांना १२ ही महिने राख्या बनविण्याचे काम पुरविल्या जात आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक राख्या बनवून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहे. लोकांचा प्रतिसाद पाहता शाळकरी मुलांसाठी राखी बनविण्याची किट तयार केल्या आहेत.