File Photo : Moon
पुणे : तुळशी विवाहाला बुधवार (दि. 13) पासून सुरुवात होत आहे. तर, शुक्रवारी (दि.15) यावर्षीच्या शेवटच्या ‘सुपरमून’चा योग आहे. त्यामुळे यंदाच्या तुळसी विवाहाला चंद्राचा 30 टक्के अधिक प्रकाश लाभणार आहे. 15 नोव्हेंबरला चंद्र पृथ्वीपासून न्यूनतम अंतरावर येणार असल्यामुळे यावेळेस नेहमीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता राहील.
हेदेखील वाचा : RSS, Hindu Politics: आरएसएसची स्पेशल 65 टीम मैदानात; हिंदूंना एकत्रित करण्यासाठी मोठा प्लॅन
चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महिन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतो व एकदा दूरही जातो. मात्र, ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून वाजवीपेक्षा कमी अंतरावर येतो. त्यावेळेस चंद्राचे बिंब नेहमीच्या पोर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हणतात. साधारणतः 12 महिन्याच्या कालचक्रात चार ते सहा सुपरमूनचे योग येतात. मागील वर्षी 29 सप्टेंबरला शेवटचा सुपरमून होता. तर आता यानंतर 2025 चा शेवटचा सुपरमून हा 4 डिसेंबर रोजी राहील.
शुक्रवारी (दि.15) जागतिक वेळेनुसार, दुपारी 4 वाजून 29 मिनिटांनी चंद्र, पृथ्वीपासून किमान अंतरावर येईल. यावेळी हे अंतर 3,61,866 किमी राहील. या बिंदूवर चंद्रजवळ 22 मिनिटेपर्यंत राहील व तो नेहमीच्या चंद्रापेक्षा 30 टक्के अधिक तेजस्वी व आकारमानात 14 टक्के मोठा दिसेल. चंद्र पृथ्वीपासून जवळ असतानाचा आकार व दूर असतानाचा आकार यात सूक्ष्म फरक असतो. त्यामुळे चंद्राच्या आकारात होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. मात्र, शास्त्रज्ञ विशेष फोटोग्राफीच्या माध्यमातून चंद्राच्या आकारातील बदल लक्षात घेऊ शकतात. तरीही आकाशात ढगांचा अडथळा नसल्यास, जिज्ञासू व अभ्यासू व्यक्तींनी, या दिवसाच्या चंद्राचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले.
पौर्णिमेचा चंद्र बिव्हरमून
सुपरमून या शब्दाची व्याख्या खगोलशास्त्रातली नाही. सुपरमून हा शब्द ‘रिचर्ड नोले’ या फलज्योतिषवाल्याने 1979 मध्ये प्रचारात आणला. सूपरमून प्रमाणेच आता वर्षातील प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला वेगवेगळी नावे देण्याचा प्रघात आहे. त्यानुसार, या महिन्यातल्या पौर्णिमेच्या चंद्राला बिव्हरमून असे म्हणतात.
तुळशी विवाह हा विवाह पूजोत्सव
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा मुहूर्त आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात.
हेही वाचा: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना धमकी, नंतर घुमजाव; धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?