मुंबई : नवसाला पावणार गणपती म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची प्रत्येक गणेशभक्ताची इच्छा असते. यामुळे लालबागच्या राजाला भेट देणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. गेल्या 5 दिवसात या भक्तांनी लालबागच्या चरणी तब्बल अडीच कोंटीच दान दिलयं. तसेच, 250 तोळं सोनं आणि 2900 तोळे चांदीही अर्पण केल्याची माहिती आहे.
[read_also content=”सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर वाहतूक मंत्रालयाच ‘हा’ मोठा निर्णय https://www.navarashtra.com/india/some-importance-decision-taken-by-transport-ministry-after-of-cyrus-mistry-death-nrps-323115.html”]
देशभरातून लाडक्या लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या काही कमी नाही. मुंबईसह देशभरातून गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात आणि अनेक भक्त सढळ हाताने दान करतात. त्यामुळे लाडक्या लालबागच्या राज्याच्या दानपेटीत दरवर्षी कोट्यवधी रुपये जमा होतात. या वर्षी तब्बल दोन वर्षानंतर गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन करायाल मिळाल्याने यावर्षी त्याला भेट देणाऱ्यांची संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
[read_also content=”राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर वाहतूक मंत्रालयाच ‘हा’ मोठा निर्णय”]
गेल्या पाच दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. या पाच दिवसात अडीच कोटी रुपये इतकं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक भक्तांनी सोने-चांदी देखील अर्पण केली असून जवळपास 250 तोळे सोनं आणि 2900 तोळे चांदीचं दान केलं आहे. गौरी-गणपतीला निरोप दिल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढली तसेच अनंत चतुर्थीपर्यंत भक्तांच्या गर्दीचा उच्चांक लालबाग राजाच्या चरणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.