मुंबई : मुलुंड (Mulund) भागात इमारतीचा स्लॅब कोसळून (Building Slab Collapse) दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू (Senior Citizen Death) झाला. मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोती छाया इमारतीचा स्लॅब कोसळून हा अपघात घडला. देवशंकर नाथालाल शुक्ला (९३) वर्षे आणि अर्खीबेन देवशंकर शुक्ला (८७) अशी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ही इमारत धोकादायक (Dangerous Building) घोषित करण्यात आली होती.
Mumbai | Two people died after a ceiling of a house collapsed in Moti Chhaya Building, Nane Pada, Mulund at around 7:45 pm today: BMC
— ANI (@ANI) August 15, 2022
मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा इमारतीला पालिकेकडून (BMC) नोटीस देखील बजवण्यात आली होती. ही इमारत वीस ते पंचवीस वर्षे जुनी आहे. दरम्यान, घटनेनंतर अग्निशामक दल आणि पोलिसांना धाव घेत जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केले; मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महापालिकेकडून ही इमारात धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानंतरही येथे काही कुटुंब वास्तव्यास होते. दरम्यान या दुर्घटनेनंतर इमारतीमधील इतर कुटुंबियांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.