Photo Credit- Social Media (लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली )
मुंबई: माझी लाडकी बहीण य़ोजनेचा निधी महिलांना मिळू नये यासाठी कोर्टात जाते. त्या काँग्रेसने आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. महिला मुलींचे संरक्षण कऱण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध आहे. पण आचारसंहिंतेला आठ दिवसच राहिल्यामुळे कोणत्याही गोष्टींच राजकारण करावं, हे काँग्रेसला चांगलं कळतं, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जवळपास दोन कोटी वीस लाख बहिणींना या योजनेचा लाभ मिळत असताना ही योजना बंद पडावी यासाठी काँग्रेस कोर्टात का गेली, याचे उत्तर आधी द्यावे, असा सवाल करत मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसला केला आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदी साहेब केंद्रात पंतप्रधान झाले, केंद्रात त्यांचे सरकार आले, त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; ‘या’ मतदारसंघांचा घेणार आढावा
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी चाकण एमआयडीसीतून 40 उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका केली आहे. असे विचारले असता उदय सामंत म्हणाले, “ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहिती नाही, ज्या व्यक्तीने महाराष्ट्राचा कधी अभ्यास केला नाही, 1961 साली महाराष्ट्रात एमआयडीसी स्थापन झालेली माहिती नाही. महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या काही वर्षांत मागे पडला होता. तो दहा वर्षात पहिल्या क्रमांकावर आला आहे. पण त्यांनी त्यांचे नेते परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्यावर बोलले, त्याबाबत त्यांनी बोलावं,महाराष्ट्र कसा सांभाळायचा ते आम्ही पाहू, अशा शब्दांत उत्तर दिले आहे.
हेही वाचा: विवाहितेने दोन मुलांसह केली आत्महत्या; नेमकं कारण तरी काय?