कणकवली : काल लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्पात मतदान झाले आहे. त्यासंदर्भात आज नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ज्यांनी आधी सरपंच पदाची निवडणूक लढवली नाही तो निवडणुकीचे आकलन करताना दिसतो. ज्याचा पक्षप्रमुख मतदानाच्या दिवशी शेंबड्यासारखा रडत असताना दिसला पराभव काय असतो याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावरचे बारा वाजलेले आणि चार दिवसानंतर परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे. हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेल आहे. निवडणुकीच्या मैदानात हे पूर्णपणे तोंडावर आपटलेले आहेत. मी या निमित्ताने गृह विभागाला विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि कुटूंबाचे पासपोर्ट जप्त करून घ्यावे. कारण ४ जूनला पराभव होणार आहे, हे सिद्ध झालेल आहे. म्हणून ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. अंगावर असलेले भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप या सर्वांमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुक आउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. यावेळी ते कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे म्हणाले.
[read_also content=”अल्पवयीन मुलीचे अपहरण करून एका खोलीत डांबलं; सलग दोन दिवस बलात्कारही केला https://www.navarashtra.com/maharashtra/physical-harassment-of-minor-girl-in-nagpur-nrka-536165.html”]
पुढे ते म्हणाले, सरळ सरळ स्पष्ट झालेला आहे की महायुतीला मोठ्या ताकतीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदार संघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेली आहे. सगळे आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहेत आणि त्यामुळे हे कालपासून जे काय रडगाणं महाविकास आघाडीच्या नेत्यांच सुरू झालेल आहे हे त्याचाच पुरावा आहे. ते या आपल्या राज्यामध्ये महायुती ४५ चा आकडा गाठत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा मोदीजींच नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेला आहे आणि ते चित्र आपल्याला ४ जूनला दिसणार आहे.
पुढे ते म्हणाले, संजय राऊत यांनी कधी लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवलेली नाही. मतदान कसं होतं? मतदान कसं मिळवायच? यांनी साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढवली नसेल, पतसंस्थांची निवडणूक पण कधी लढली नसेल. तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पहिलं संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे यांनी लोकांमध्ये निवडणूक लढवून निवडून यावे अशी खोचक टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
पुढे नितेश राणे म्हणाले की, निवडणुकीचा मतदानाच्या दिवशी या गोष्टी घडत असतात. लोक उन्हाळ्यामध्ये निघत नाही. महिला माता-भगिनी कधीतरी जेवणाची आणि स्वयंपाकाची सगळी काम केल्यानंतर बाहेर मतदानासाठी निघत असतात. ही सगळी विविध पॅटर्न आहे. हे ज्यांनी निवडणूक लढवली त्यांनाच कळणार. म्हणूनच त्यांच्या या विश्लेषणाला कोण भीक देत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विजवून टाकलेली आहे. ४ जूननंतर भिजलेली मशाल किंवा आईस्क्रीमचा कोन घेऊन उभा राहिलेला उद्धव ठाकरे सर्वांना दिसेल. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल चिन्हाचे बटनच दाबायचे नाही असे ठरवलेले असल्यामुळे इथे जास्त मतदान होतं असं म्हणायचं सवालच येत नाही.
[read_also content=”मुंबईतील मतदान घोळाची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-elections-chief-minister-eknath-shinde-orders-the-chief-secretary-the-polling-scandal-in-mumbai-will-be-investigated-nrpm-536176.html”]
पुण्याच्या त्या दुर्घटनेबद्दल आमचे पोलीस किती सतर्क आहेत हे कारवाई होत असताना दिसत आहे. कोणीही कोणतीही दयामाया दाखवलेली नाही. पण संजय राऊत यांनी हे लक्षात ठेवावे की हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत, गृहमंत्री तुमचे अनिल देशमुख नाहीत, हे महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत, म्हणून जसं दिशा सालीयनच प्रकरण लपवा – लपवी केलं आहे, सगळे पुरावे नष्ट केले. तसं या पुण्याच्या केस मध्ये होणार नाही. तेव्हा परमवीर सिंग, त्रिमुखे, सचिन वाझे, पोलीस खात्याला कसं वापरलं हे आम्ही खुल्या डोळ्यांनी बघितलेल आहे. म्हणून तर ७२ दिवस सीबीआयला येण्यापासून या लोकांनी रोखलं. संजय राजाराम राऊत यांनी तुमचं महाविकास आघाडीच्या सरकारने जसं पोलिसांना घरगड्यासारखे वापरत होता, तसं आम्ही करत नाही. तेव्हा तुम्ही परमवीर सिंगला बडतर्फ केलात काय? तेव्हा कुठल्याही पोलीस आयुक्तांवर चौकशी लावली काय? म्हणून जे काय व्यवस्थित पद्धतीने कारवाई होईल आणि त्याला शिक्षा व्हायची आहे त्याला शिक्षा होईल. हे आमचं महायुतीच्या सरकार आहे आणि योग्य पद्धतीने तपास होईल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
संजय राजाराम राऊत आणि त्याचा तो तीन पट भाव काल भांडुपमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न करत होते. मात्र तो प्रयत्न सपशेल फसला. निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत किंवा आजूबाजूची जनता आहे ती सतर्क होती. या दोन्ही राजाराम राऊत यांच्या मुलांना बूथ कॅप्चरिंग करायला दिले नाही. हे काय तुमच्या ममता बॅनर्जींचं वेस्ट बंगाल नाही. हे आमचं महाराष्ट्र आहे, इथे तुम्ही बुथ कॅप्चरिंग करत असताना या दोन भावांची काय अवस्था झाली ते सर्वांनी पाहिला आहे. अक्षरश: त्यांना तिथून पळून जावं लागल. त्याने आम्हाला शिकवू नये, नियम कोण तोडत असेल तर त्याला कायदेशीर शिक्षा होईल. याचा अंदाज त्यांनी काल घेतलेला आहे असा टोला देखील आमदार नितेश राणे यांनी लगावला.