फोटो सौजन्य- Milind narvekar X account
विधानपरिषद निवडणूक: आज दि. १२ जुलै रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये उध्दव ठाकरेंचे शिलेदार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. तर शरद पवार गटाचा पाठिंबा असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा अखेर पराभव झाला आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे गेली अनेक वर्षे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. उध्दव ठाकरेंचे राईट हॅंड म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पहिल्या पसंतीची २२ मते मिळाल्यानंतर विजयासाठी मिलिंद नार्वेकर यांना एका मताची गरज होती. त्यांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीची मतांमुळे त्यांचा विजय झाला.
निवडणूक चुरशीची
ज्यावेळी ११ सदस्यांच्या जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज भरला त्याच वेळी ही विधानपरिषदेची निवडणूक ही चुरशीची होणार हे ठरल होत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाच्या ९ पैकी ९ उमेदवारांचा विजय झाल्याने महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित होत. कॉंग्रेसकडे ३७ सदस्य संख्या असल्याने प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होता. त्या सहजरित्या निवडून आल्या. मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचे समर्थन असलेले शेकापचे जयंत पाटील यांच्यातून एक जण जिंकणार होते. मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या फेरीची २२ मत मिळाली होती तर जयंत पाटील यांना १२ मते मिळाली होती.त्यामुळे मिलिंद नार्वेकर विजयासाठी प्रबळ दावेदार होते अखेर दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर ते जिंकून आले.
कॉंग्रेस पक्षाचा विजयामध्ये वाटा
मिलिंद नार्वेकर यांच्या विजयामध्ये ठाकरे गटाला कॉंग्रेस पक्षानेही महत्वाची भूमिका पार पाडली. ठाकरे गटाकडे विधानसभेचे १५ सदस्य होते त्यामुळे त्यांच्याकडे हक्काची १५ मते होती मात्र निवडून येण्यासाठी २३ हून जास्त मतांची गरज होती. यासाठी ठाकरे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अतिरिक्त मतांची जुळवाजुळव केली आणि आपल्या शिलेदाराला निवडणून आणले. मिलिंद नार्वेकर हे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांचा वैयक्तिक पातळीवर सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांशी चागंले संबंध असल्याने त्या संबंधाचाही वापर त्यांनी या निवडणूकीत केला असेल.