• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Unveiling Of Shrikant Shindes Resolution Maharashtra Government Kalyan

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण, रेल्वेचा प्रवास होणार सुखकर

डॉ श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले संकल्पपत्राचे अनावरण, कल्याणकरांची पाण्याची चिंता मिटणार, पुढील पाच वर्षांचे व्हीजन जाहीर

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 16, 2024 | 05:36 PM
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण, रेल्वेचा प्रवास होणार सुखकर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कल्याण : गेली १० वर्ष खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढील पाच वर्षाचे व्हीजन आज पत्रकार परिषदेत सादर केले. यात मतदार संघातील रेल्वे स्टेशनलगत ट्रॉमा सेंटर, रेतीबंदर ते कल्याणपर्यंत कोस्टल रोड, अँक्सेस कंट्रोल फ्रिवे, इंटर्नल मेट्रोने शहरे जोडणे आणि पाणी पुरवण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे वचन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संकल्प पत्रात दिले आहे.

[read_also content=”सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेला पालघर जिल्ह्यात पैसे वाटप तरीही खुर्च्या रिकाम्याच https://www.navarashtra.com/maharashtra/money-distribution-for-sudhir-mungantiwars-meeting-in-palghar-dr-hemant-savara-534060.html”]

यासंदर्भात श्रीकांत शिंदे म्हणाले की, २०१९ च्या जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वासने पूर्ण केली. कल्याण यार्ड रिमॉडलिंगचा ८०० कोटींचा प्रकल्प होत आहे. यामुळे मेल एक्सप्रेस, लोकल सेवा यांना क्रॉसिंग बंद होऊन स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होईल. खारेगाव, दिवा, ठाकुर्ली आणि कल्याण पश्चिम येथील रेल्वे फाटक बंद झाले आहेत. त्यामुळे पुढील एक वर्षात पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होऊन कल्याण ते कुर्लापर्यंत शटल सेवा सुरु करणे शक्य होईल, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा शटल सेवा, दिवा वसई मार्गावर लोकल सेवा, कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यातील तिसरी मुंबई कल्याण परिसरात होणार असून पुढील पाच वर्षात येथे पायाभूत सुविधांचा नियोजन बद्ध पद्धतीने विकास केला जाईल, अशी ग्वाही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

कल्याणमध्ये मेट्रो १२ चे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर बदलापूरपर्यंत मेट्रो १४ ला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरु होईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विठ्ठलवाडी ते शहाड हा ब्रीज करण्यात येणार आहे. कल्याणमध्ये यूटाईप रोड, इतर शहरात पार्किंग प्लाझा सुरु केले जातील, असे आश्वासन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.

[read_also content=”राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर कोलकाता नाईट राइडर्सने रचला इतिहास https://www.navarashtra.com/sports/after-defeating-rajasthan-royals-kolkata-knight-riders-created-history-534111.html”]

उल्हासनगरातील २०० बेड्सचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरु करणे, स्पोर्ट्स स्टेडियम, महिलांसाठी, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा मानस डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच सुरु होणार आहेत. कल्याणमध्ये एम्सच्या धर्तीवर हॉस्पिटलची मागणी करण्यात आली असे ते म्हणाले.

अंबरनाथमधील यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र इतर शहरांमध्येदेखील सुरु करण्यात येतील. मतदार संघातील सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. अंबरनाथमध्ये आयटीआयचे आधुनिकीकरण करणे, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी अंतरलीमध्ये महाहब मंजूर करण्यात आले असून ते लवकरच सुरु करण्यात येईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये टाटा इन्स्टीट्युकडून २०० कोटींचा निधी मिळाला असून तेथे सेंटर फॉर एक्सलन्स सुरु केले जाणार आहे.

२०१४ मध्ये अडीच लाख आणि २०१९ मध्ये साडे तीन लाखांच्या मताधिक्याने मतदारांनी निवडून दिले. सलग दोन वेळा माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. महायुतीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम केल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Unveiling of shrikant shindes resolution maharashtra government kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 16, 2024 | 05:36 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • maharashtra
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande  यांचा विशेष सन्मान!
1

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande यांचा विशेष सन्मान!

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना
2

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!
3

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव
4

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…

Devendra Fadnavis: गुंड निलेश घायवळ प्रकरणात CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले…

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन 

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन 

South Africa vs Namibia : निवृत्तीनंतर पुन्हा संघात परतला दिग्गज, पण मैदानात बॅट राहिली मौन; वाचा सविस्तर 

South Africa vs Namibia : निवृत्तीनंतर पुन्हा संघात परतला दिग्गज, पण मैदानात बॅट राहिली मौन; वाचा सविस्तर 

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

व्हिडिओ

पुढे बघा
Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Navi Mumbai : नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजार गजबजले

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार शुभारंभ; विविध क्षेत्रांतील ‘इन्फ्लुएन्सर्स’चा गौरव

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार शुभारंभ; विविध क्षेत्रांतील ‘इन्फ्लुएन्सर्स’चा गौरव

Ahilyanagar : वंजारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांचे जलसमाधी आंदोलन

Ahilyanagar : वंजारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांचे जलसमाधी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.