
चित्रपट निर्मिती संस्था नागपूरची असून नागपूरकर रसिक प्रेक्षक व श्रोत्यांचा विशेष अभिमान आहे. 'प्रेम लागी जीवा' या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन १६ मार्च रोजी पत्रकार प्रेस क्लब नागपूर येथे होत आहे.
नागपूर : कस्तुरी फिल्म एंटरटेनमेंट वर्ल्ड निर्मित ‘प्रेम लागी जीवा’ हा मराठी चित्रपट २२ एप्रिल २०२२ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता खांडेकर यांनी केली असून चित्रपटाचे सहनिर्माता नागेश थोंटे आहेत. दिग्दर्शक सोमनाथ लोहार असून असोसिएट दिग्दर्शक हर्षद पठाडे आहेत. चिटपटाचे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील वाढवना या गावी करण्यात आले आहे. तसेच, चित्रपटाचा काही भागाचा शूट हा कोकण येथे हिदवी बीचवर झाला आहे. याचे डिस्ट्रिब्युटर पिकल एंटरटेनमेंट मीडिया प्रायवेट लि. मुंबई असून पोस्ट प्रोडक्शन साईराज मीडिया मुंबई व जे के स्टुडिओ मुंबई हे आहेत.
चित्रपट निर्मिती संस्था नागपूरची असून नागपूरकर रसिक प्रेक्षक व श्रोत्यांचा विशेष अभिमान आहे. ‘प्रेम लागी जीवा’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन १६ मार्च रोजी पत्रकार प्रेस क्लब नागपूर येथे संध्याकाळी ५.०० वा. होत असून, झी म्युझिक कंपनी या चैनलवर १७ मार्च पासून चित्रपटाच्या गीतांचे प्रसारण होणार आहे. या चित्रपटात या कलावतांनी भूमिका साकारल्या आहेत. सोमनाथ लोहार,वैशाली साबळे, प्राजक्ता खांडेकर, रवींद्र ढगे, नागेश थोंटे, जॉनी रावत, राजेंद्र जाधव,हर्षद पठाडे, मयुरी नव्हाते, राजश्री अहिरे,माधुरी वरारकर,श्री खराडे,रविराज सागर,साक्षी सावंत,दीपाली लोहार,आकाश दळवी, विष्णू उपाद्ये, राजेंद्र कांबळे, अनिल सुरवसे, ज्योती पाटील, वैष्णवी बारूरे, बाल कलाकार सौंदर्या स्वामी आहे.