मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंचा (Vinayak mete accident) अपघात झाला. (Mumbai pune highway) मराठा समाजासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) संघर्ष करणारा नेता गमावल्यानं सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या चालकाच्या हालगर्जीपणमुळं अपघात झाल्याचं बोललं जात आहे, दरम्यान, विनायक मेटेंचे पार्थिव सध्या त्यांच्या मुंबईतील (Mumbai) घरी अत्यंदर्शनासाठी आणण्यात आले आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरू आहे, जेजे रुग्णालयात (JJ hospital) करणार शवविच्छेदन होणार आहे. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला नेता हरपला, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली आहे.
[read_also content=”राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, ‘वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी’ https://www.navarashtra.com/maharashtra/cabinet-ministers-cist-announced-by-cm-eknath-shinde-and-governor-316009.html”]
दरम्यान, आज अत्यंदर्शनानंतर त्यांच्यावर उद्या बीडमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत, बीडमध्ये दुपारी एक वाजता अत्यंसंस्कार होणार आहे. अपघातानंतर विनायक मेटेंना मदत तातडीने मदत मिळाली नाही. ते काही तास घटनास्थळीच पडून होते, असा आरोप मेटेंसोबत असलेल्या सहकाऱ्याने केला आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात वडाळ्यात गर्दी केली आहे.