Photo Credit- Team Navrashtra कल्याण प्रकरणातला आरोपी विशाल गवळी भाजपचा कार्यकर्ता; महेश गायकवाडांचे आरोप
मुंबई: कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, यावरून कल्याणमध्ये राजकारण तापलं आहे.या प्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी याला अटक करण्यात आली आहे. पण विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजप त्याला पाठिशी घालत असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे. त्याचवेळी विशाल गवळीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ असलेली पोस्ट दाखवून भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला असता गायकवाड यांनी यात राजकारण आणू नये, असा टोला लगावला आहे.
खोट अकाऊंट बनवून माझ्या नावाने पोस्ट करत माजी बदनामा केली जात आहे. याबाबत चौकशी करून भाजप पदाधिकाऱ्यंवर कारवाई करावी,अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणात जुंपली असतानाच सरकारी वकील उज्वल निकम यांना या प्रकरणात वकील म्हणून नेमण्यात आले आहे. पण या प्रकरणात निकम यांची नेमणूक करू नये, अशी मागणीही गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे.
महेश गायकवाड यांनी आज कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून जी पोस्ट दाखवण्यात आली ती खोटी असल्याचा दावा केला. तसेच, माझे खोटे अकाऊंट बनवून माझा फोटो अपलोड करण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातही भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही महेश गायकवाड यांनी केली आहे.
महेश गायकवाड म्हणाले, विशाल गवळीचं पेज आजपर्यंत कुणालाच मिळालं नाही, मग ते भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना कसं मिळालं, खोटे आरोप करून विशाल आणि त्याचे कुटुंब भाजपशी असलेले संबंध नाकारू शकत नाही. खोटे आरोप करून तुम्ही तुमची पापे लपवू शकणार नाहीत.
बचत करण्याची सुवर्णसंधी! नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी स्वस्त झाला Realme चा जुना फोन
वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त केली. मग ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी गणपत गायकवड आणि त्यांचा मुलगा आणि त्या फरार आरोपींची संपत्ती जप्त का केली नाही, त्यांना अटक का केली नाही. भाजप आरोपींना पाठिशी घालतय का, असा सवालहीत्यांनी उपस्थित केला. तसेच, जोपर्यंत विशाल गवळीला फाशी होत नाही तोपर्यंत आंदोलन उग्र होत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कल्याण प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
कल्याण पूर्वेमध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुलाजवळील स्मशान संकुलात मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित महिला सोमवारी संध्याकाळपासून घरातून बेपत्ता झाली होती. बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह एका गटारात सापडला.