स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोलापूरमध्ये १० नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Local Body Elections : सोलापूर : आज सकाळपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मतदान होत आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सोलापूरमध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सायंकाळी बंद करण्यात आले. सांगोला येथील विद्यामंदिर प्रशाला,जिल्हा परिषद शाळा धनगर गल्ली, जिल्हा परिषद शाळा,भोपळे रोड येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमधील बटण दाबण्यात अडचण आल्याने ईव्हीएम मशीन या केंद्रातील बदलण्यात आले आहेत. अशी माहिती सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला कळविले आहे.
जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १० नगरपरिषदेसाठी मंगळवार, रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रकियेस प्रारंभ झाला. जिल्ह्यात एकूण ४९९ मतदान केंद्र असून, १३२२ बॅलेट युनिट व ६११ कंट्रोल युनिटच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले . मतदान प्रकिया शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी बूथ व केंद्रनिहाय तीन पोलीस तैनात करण्यात आले होते. एक हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. २७०० हुन अधिक प्रशिक्षणार्थी कर्मचारी निवडणूक प्रकियेत सहभाग घेतला आहेत. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रकिया ज्या-त्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय गोडावून येथे पार पडणार आहे. मतदान केंद्र आणि मतमोजणी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला.
लोकशाहीची ऐशी की तैशी? एकनाथ शिंदेंच्या बॅगांवरुन खासदार संजय राऊतांची टीका
मोहोळ येथील नेताजी प्रशालेत ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रीक बिघाड झाल्याची तक्रार माजी आमदार रमेश कदम यांनी केली .
मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अर्धा तास मतदान प्रक्रिया बंद पडली. दरम्यान मोहोळ शहरातील आठवडी बाजार मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्यावरुन माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपवर आरोप केला आहे. मतदान केंद्रावरील वोटिंगमशीन वर केवळ भाजप चिन्हाचे बटन दाबले जात असल्याचा रमेश कदमांनी आरोप केला आहे. तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने त्यांच्या पायाखालीची वाळू सरकली, असे प्रत्युत्तर भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील १ नंबर बुथवरील मशीन १ तास बंद आहे. भाजप उमेदवार शितल क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम मतदान केंद्रावर दाखल होऊन मशीन बंद पडल्या बाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
१० नगर परिषदांसाठी मतदान
सोलापूरमधील 10 नगर परिषदांसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, बार्शी, पंढरपूर, सांगोला, करमाळा, मोहोळ, कुर्डुवाडी, अकलूज या नगरपरिषदेसाठी मतदान घेण्यात आले . मतदारांतून १० थेट नगराध्यक्ष व २४५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. जवळपास ४ लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजाविला आहे. दुपारी ३ वाजे पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार शांततेत मतदान सुरू असून टक्केवारी जवळपास ४० पुढे आहे. मोहोळ, अक्कलकोट, अकलूज येथे कांही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदान खोळंबल्याच्या तक्रारी होत्या.
सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चुरशीच्या निवडणूका आहेत. मोहोळ, अक्कलकोट, सांगोला, करमाळा, दुधनी येथे भाजपा व शिंदे सेनेत सामना होतोय. तर बार्शी, कुर्डुवाडीत भाजपाचा सामना उबाठा व शिंदे सेने बरोबर आहे. अकलूजच्या लढतीकडे जिल्ह्याच लक्ष असून येथे मोहिते पाटलांना भाजपाचं कडव आव्हान आहे. पंढरपूरात भाजपासमोर तीर्थक्षेत्र आघाडीने आव्हान निर्माण केल आहे बार्शीत राऊत-सोपलांमध्ये झुंज आहे. पक्षीय आघाड्या असल्या तरी स्थानिक नेतृत्वा भोवतीच निवडणूका फिरत असल्याने त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचा कस या निवडणूकीत लागतोय. उद्या होणारी मतमोजणी प्रक्रिया न्यायालयीन आदेशामुळे पुढे गेल्याने कार्यकर्त्यांत मात्र निराशा पसरली आहे. आता निकालासाठी २१ डिसेंबर म्हणजेच तब्बल १९ दिवस थांबाव लागणार आहे.






