पिंपरी- वरिष्ठांच्या सांगण्यानुसार काम करा नाही, तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत तसेच सोबत फिरायल आणि जेवायला चल म्हणत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या बँकेतील वरिष्ठ अधिकारीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बँकेचे चीफ एग्जेक्युट ऑफिसर मनोज लक्ष्मनदास बक्षाणी (वय 54, रा. साई चौक, पिंपरी, पुणे) या इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दि. सेवा विकास बँकेतच काम करतात. आरोपीने फिर्यादीला “तुम्ही श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्या प्रमाणेच काम करा, नाहीतर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू”, अशी धमकी दिली. तसेच महिलेला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने त्यांचा हात पकडून त्यांच्या बरोबर अश्लिल चाळे व शेरेबाजी केली. त्याच बरोबर, तु एकदा तरी माझ्या बरोबर फिरायला चल, हॉटल मध्ये जेवायला चल, अशी मागणी करत तिल कामावरुन काढून टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरुन मनोज याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान बँकेच्या महिला भागधारक आणि कर्मचार्यांनी आरबीआय द्वारे बँकेत लिक्विडिटर दादासाहेब काळे यांना मनोज बक्षाणी यांना तत्काल निलंबित करण्याची मागणी केली असून या मागणी साठी बँकेवर मोर्चा काढण्याचा तसेच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.