या गावात पाणीटंचाई! पावसाचे पाणी साठवून तहान भागवण्याची वेळ...
कर्जत : कर्जत तालुक्यातील वाकस ग्रुप ग्रामपंचायत मधील कोलीवली आणि नेवाळी या गावांना सध्या सुरु असलेल्या पावसाळयात देखील पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मागील चार दिवसापासून ग्रामपंचायतसाठी पाणी सप्लाय करणारी मोटर जळाल्यामुळे चार दिवस पाणी नळाला आले नाही. त्यामुळे पाणी पिण्यासाठी येत नाही, ही समस्या लक्षात घेऊन समाजसेवक सचिन धुळे यांनी कोळिवली आणि नेवाली गावांसाठी दिवसभरामध्ये चार टँकर पुरवून पाणी पिण्याची व्यवस्था केली.
नेरळ कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या वाकस ग्रामपंचायत मधील नेवाळी आणि कोलिवली या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या जो ऋतू चालू आहे त्यामध्ये दिसूनही येत नाही कुणालाही हिवाळा आहे की पावसाळा आहे.जल मिशन योजना जेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये राबवण्यात येत असून त्या नळपाणी योजनेतून त्यावेळी या दोन गावांना यातून वगळण्यात आले आहे.जलजीवन मिशनचे काम अर्धवट आणि मनमानीपणे सुरु असल्याने त्या मनमानी कारभारामुळे अशा अनेक गावांना पाणी पिण्याची टंचाई भासत आहे. नऊ ते दहा महिने होऊन ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा कार्यकाळ संपला आहे.
त्यामुळे सध्या तेथे असलेले प्रशासक यांच्या माध्यमातून सुरु असलेला कारभार हा जनतेच्या विरुद्ध सुरु आहे.परंतु या प्रशासकाच्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत मधील समाजसेवक कार्यकर्ते सचिन धुळे यांच्या माध्यमातून आम्हाला टँकरने पाणी पुरवले गेले. आणि पाण्याची काय गरज आहे ही महिलांना कळत असते आणि त्यांची समस्या जाणून घेऊन समाजसेवक सचिन धुळे यांनी टँकर चे पाण्याची सोय केली.
स्थानिक ग्रामस्थ हरेश सोनावले यांनी कोलिवली गावाच्या बाहेर बांधण्यात आलेली पाण्याची राजकी नादुरुस्त झाली असून देखील त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.त्यांचवेळी स्थानिकांच्या पाण्याबाबत सतत ओरड असून देखील प्रशासक यांना गावात जाण्यास वेळ मिळत नाही. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय सुरु असल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त असून नवीन नळपाणी योजनेत या दोन्ही गावांचं समावेश करावा अशी मागणी सोनावले यांनी केली आहे.






