मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) परिसरातील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजेपासून ६ मे रात्री ११.५५ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. कपातीच्या कालावधीत संबंधित नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.
बोरीवली व दहिसर परिसरातील जलवाहिनीचे काम करताना येथील पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कपातीपूर्वी नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवावा लागणार आहे.
‘आर मध्य’ विभागातील चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा व संपूर्ण बोरिवली (पश्चिम) विभागात सायंकाळी ७.१० ते रात्रौ ९.४० आणि सकाळी ११.५० ते दुपारी १.५० ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, कामामुळे या वेळात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.
[read_also content=”३०० कंपन्या चेक करून मयताची ओळख पटविल्यानंतर बिहारमधून दोघांना बेड्या ठोकल्या https://www.navarashtra.com/maharashtra/after-checking-300-companies-and-identifying-mayata-the-two-were-handcuffed-from-bihar-nrdm-275347.html”]
‘आर उत्तर’ विभागातील एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गांव, कांदरपाडा, लिंक रोड व संपूर्ण दहिसर (पश्चिम) विभागात रात्री ९.४० ते रात्री ११.५५ ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे. मात्र, या वेळात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.