पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधान केले. ‘शिवछत्रपतींचं राज्य हे भोसलेंचं राज्य नव्हतं ते हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. या देशानं अलिकडच्या काळानं, या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आत्ता होती. या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शाहिस्तेखानवर छत्रपतींनी केली’, असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्या भाषणातली प्रमुख मुद्दे :
1. लोकमान्यांचा 103 वी पुण्यतिथी आहे.
2. ऐतिहासिक पुणे शहरात सोहळा होतोय.
3. छत्रपती शिवरायांचा इतिहास सगळ्या जगाला माहित्येत.
4. छत्रपतींचा जन्म शिवनेरीचा, त्यांचं लहानपण लाल महाल
5. हिंदवी स्वराज्याच्या निर्माण छत्रपतींनी केलं.
6. शिवछत्रपतींचं राज्य हे भोसलेंचं राज्य नव्हतं ते हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं.
7. या देशानं अलिकडच्या काळानं, या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आत्ता होती.
8. या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शाहिस्तेखानवर छत्रपतींनी केली.
9. लोकमान्यांचा सुरुवातीचा काळ ब्रिटिंशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी सामान्य माणसाला एकत्र केलं पाहिजे.
10. सर्वात मोठं शस्त्र पत्रकारिता, 25 वर्षांच्या काळात केसरी, मराठा ही वृत्तपत्रं सुरु केली.
11. याद्वारे इंग्रजांच्या विरोधात कठोर प्रवाह केला.
12. पत्रकारितेवर दबाव असता कामा नये, असं लोकमान्य म्हणत असत, ती भूमिका त्यांनी सातत्यानं पाळली
13. 1885 साली काँग्रेसचा जन्म झाला. पहिलं अधिवेशन पुणे शहरात होणार होतं, मात्र प्लेगमुळं ते होऊ शकलं नाही.
14. दोन प्रकारचे नेते होते, जहाल आणि मवाळ, जहालांचं प्रतिनिधित्व लोकमान्यांनी केलं.
15. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, ही भूमिका त्यांनी जनतेच्या मनावर मांडली.
16. टिळक युग आणि गांधी युग हे दोन्ही एकत्र होतं. हे दोन्ही आम्ही विसरु शकत नाही. नव्या पिढीला या दोन्ही नेत्यांचा आदर्श मिळत राहील.
17. मान्यवरांच्या यादीत पंतप्रधानांचा समावेश ही आनंद, याबाबत त्यांचं अभिनंदन करतो.