Photo Credit- Social Media( असं काय झालं की वर्षा गायकवाड इतक्या भडकल्या?)
मुंबई: राज्यसरकारच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्णाण झाली आहे. चंद्रपुरातूल माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा अहमदाबादमधील अदानी फाऊंडेशकडे देण्याचा अध्यादेश राज्य शिक्षण विभागाने काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस खासदार वर्ष गायकवाड यांनी राज्य सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणत, याचं उत्तर द्यावाच लागले’, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट करत राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.
हेही वाचा: इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध; काय आहे कारण?
“महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे.. चाललंय तरी काय? सध्या महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आणि अदानीच्या दावणीला बांधलेला आहे, असंच दिसतंय. पहिलं महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला पळवले, इथल्या संस्था तिकडे वळवल्या, मुंबईचं रिअल इस्टेट मार्केट अदानीच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र रचलं गेलं.” असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
तसेच, “मुंबईतील एअर पोर्ट, एअर पोर्ट कॉलनी, धारावी, मुलुंड, देवनार, मिठागराच्या जागा, एमएसआरडीसी वांद्रे रेक्लेमेशन येथील जागा आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा पाप या सरकारनं केला.. आता शाळा ही देत आहेत, पुढे महापालिका आणि ग्रामपंचायतही गुजरातच्या अदानीच्या ताब्यात देतील.. हे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार महाराष्ट्र गिळू पाहत आहे. यांना हटवा. चंद्रपूरमधली शाळा चालवण्यासाठी महाराष्ट्रातील एकही संस्था नव्हती का? गुजरातच्या अदानीकडेच का दिली? याचं उत्तर या महाराष्ट्रद्रोही सरकारनं द्यावं, असा शब्दांत त्यांनी राज्य सरकारला इशाराही दिला आहे.
इतकेच नव्हे तर त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधत ‘एक्स’वर पोस्ट करताना ‘महाराष्ट्र आॅन सेल, गुजरातवादी सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, मोदानी हटाव महाराष्ट्र बचाव’, असे ‘हॅशटॅग’ वापरले आहेत.
हेही वाचा: पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग आजपासून सुरू; तिकीट किती असणार?
महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे.. चाललंय तरी काय? सध्या महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आणि अदानीच्या दावणीला बांधलेला आहे, असंच दिसतंय.
पहिलं महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला पळवले, इथल्या संस्था तिकडे वळवल्या, मुंबईचं रिअल इस्टेट… pic.twitter.com/RCiME4EB72
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 29, 2024