अंबादान दानवेंनी राणेंच्या जखमेवर मीठ चोळलं
Ambadas Danve on Nitesh Rane: भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काही दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये आयोजित एका सभेत बोलताना नितेश राणे यांनी, “कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले, तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा,” असा दम भरला होता. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा बाप कोण असा सवाल उपस्थित करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली.
नितेश राणेंच्या या वक्तव्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाराजी व्यक्त करत, अशा प्रकारचे बोलणे टाळा, असा सल्ला नितेश राणेंना दिला. पण या घडामोडींनंतर मात्र नितेश राणेंच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे आमदार, अंबादास दानवे यांनी थेट नारायण राणेंचे नाव घेत डिवचलं आहे.
नितेश राणे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर अंबादास दानवे यांनी थेट नारायण राणेंचे नाव घेत राणे-पिता पुत्रांवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांना नितेश राणे आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या वादाबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, नारायण राणे हे नितेश राणे यांचे बाप आबेत. हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस त्यांचे बाप कसे झाले, ते मला कळलंच नाही.
नेमकं काय प्रकरण?
धाराशिव – जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपाच्या स्थगितीवरून बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी घटक पक्षांना थेट इशारा दिला. “कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा,” असा दम त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिला. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले, “देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, हे विसरू नका.” त्यांच्या या आक्रमक भाषेवर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बाबा सिद्धीकी हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला कॅनडात अटक; भारतात आणायची प्रक्रिया सुरू
या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही हा विषय चर्चेला आला. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही मंत्र्यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी राणेंना समज दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
या आधीही नितेश राणेंनी, “काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय…” असं विधान करत खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरूनही महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पण यावेळी त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत थेट महायुतीतील घटकपक्षांनाच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार केली. त्यानंतर फडणवीस यांनी नितेश राणेंना समज दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाचाही ‘बाप’ काढणं योग्य नाही. मी नितेश राणेंशी बोललो. ते म्हणाले की माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुमच्या मनात काहीही अर्थ असले, तरी लोकांमध्ये जे परसेप्शन तयार होतं, त्यालाच राजकारणात महत्त्व असतं.”