कल्याण : राज ठाकरे यांनी काल कोकणातील सभेत भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली होती याबाबत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, आमच्या गावाकडे एक म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे आपण टाळ्या ऐका असा टोला लगावला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, पंधरापैकी चार ते पाच जागा येतात का हे आधी त्यांनी बघावं, निवडणुका जिंकण्यासाठी शेरोशायरी कामाला येत नाही तर केलेलं कामाचा पाढा कामाला येतो अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शेरोशायरी करत निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिले सुषमा अंधारे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे आमच्यासाठीच राज्यभर वातावरण चांगलं आहे. आम्ही थ्री प्लस वन झालो तरी आम्ही जिंकणारे असो पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे 14-15 पेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील. पंधरा मधले पाच जागा तरी टिकवता येतात का हे त्यांनी पहावं. शेरोशायरी, कविता, श्लोक, अभंग, पोवाडे, गवळणी या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत तर इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले काम आणि त्या कामांचा पाढाच कामाला येतो असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर त्या पाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि माझे महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोघांचेही अर्ज वैध झाले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ऐनवेळी उमेदवार बदलणार असल्याचे देखील चर्चा कार्यकर्त्यांमधून सुरू आहे. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी अलबेल नाही काहीतरी वेगळी गोष्ट असेल असं समजायचं कारण नाही. शिवसेनेमध्ये अंतिम शब्द पक्षप्रमुखांचा असतो पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आमचं काम आहे. निश्चितपणे तुम्हाला उद्या ही सगळी उत्तरं मिळतील, ज्या अर्थी मी इथे आहे एवढा वेळ काढून आली आहे, मी आजही असणार मी उद्याही असणार आहे, मला असं वाटतं की उद्या या निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करू उद्या उत्तर मिळेल असे सांगत उमेदवारी दर्जाबाबत सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केलं.
एका एचआर कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीमध्ये मराठी पीपल आर नॉट अलाऊड असं लिहिण्यात आलं होतं. यानंतर नेटिजन्स ने या रिक्रुट मेंट एजन्सीवर टीकेचा भडीमार केला. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना टोला लगावला, ज्यावेळेला एखादी जाहिरात येते तीही विशेषतः सुरत बेस कंपनीकडून येते आणि marathi people are not allowed असं सांगितलं जातं, महाराष्ट्रातल्या एका माणसाला महाराष्ट्रातच मराठी पेपर नॉट अलाऊड असे बोर्ड लावले जातात त्यावेळेला यावर प्रश्न जास्त मराठीचा गवगवा करणाऱ्या इंजिन वाल्या दादांना विचारलं पाहिजे. कारण 370 चा मुद्दयावरून कोकणात जाऊन मतं मागणाऱ्यांनी 370 च्या मुद्द्यावर काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करावा. पण महाराष्ट्रात मराठी माणसाचे काय हाल होता आहेत, मराठी माणसाचे रोजगार कसे जात आहेत, यावर मराठीच्या अस्मितेचा राजकारण करणारे लोक कधी तोंड उघडणार हा खरा प्रश्न आहे असा टोला नाव घेता राज ठाकरे यांना लगावला.