Photo Credit- Social Media
धुळे: राज्य विधानसभेच्या निवडणुकी जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी राजकारणातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. महायुतीसह इतर अनेक पक्षांचे नेते मंडळींच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याची गाठीभेटी वाढू लागल्या आहेत. गेले दोन दिवस शरद पवार नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यातही काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. ज्याची दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू होती.
शरद पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजपचे आमदार अमरिश पटेल हेदेखील शरद पवार यांच्या स्वागताला हजर होते. शिंदखेडा तालुक्यातील मेळाव्यानिमित्त शरद पवार शिरपूरच्या विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमरिश पटेल तिथे आले होते. त्यांना तिथे पाहिल्यानंतर शरद पवार यांनी ‘तुम्ही तर दुसऱ्या पक्षाचे आहात’ असे प्रतिक्रीया दिली. पण हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा: मनु भाकरने केले नीरज चोप्राचे अभिनंदन! सोशल मीडियावर रंगल्या लग्नाच्या चर्चा
पण अमरिश पटेल यांनी शरद पवारांच्या स्वागताबद्दल खुलासा केला. पण त्याचवेळी त्यांनी, शरद पवार यांनी आपल्याला राजकारणात संधी दिल्याचे सांगून संकेत दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, एकेकाळी धुळे आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण 2019 च्या विधानसबा निवडणुकीपूर्वी नंदुरबारचे गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमरिश पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला.
तर, शिंदखेड्याच्या मेळाव्यात बोलताना, शरद पवार यांनी शेतमालाचे घसरलेले भाव आणि दमदाटीच्या राजकारणावरून भाजपवर टीका केली. “मी दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम केले. त्यवेळी देश अन्नधान्यांच्या बाबत स्वंयपूर्ण झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकऱ्यांविषयी कसलीही आपुलकी नाही. शेतीसंदर्भातलं योग्य धोरण राबवले जात नाही. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला भाव मिळाला नाही. गहू, तांदळाबाबतही हेच झालं. जे पिक घ्याल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी केली. केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे.’ अशा शब्दांत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
हेही वाचा: मेथीची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मेथीचे पराठे