राज्यातील प्राचार्यांसाठी आनंदाची बातमी ! निवृत्तीचे वय 62 वरून होणार 65 वर; उच्च शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत (File Photo : Teachers)
धुळे : जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन एक तारखेला करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त वेतन अधीक्षक रामकृष्ण लोहार यांनी दिले.
धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने वेतन अधीक्षक रामकृष्ण लोहार यांची भेट घेतली व सत्कार केला. यावेळी लोहार यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी एप्रिल व मे महिन्याचे वेतन, विविध वेतन शीर्षकाखाली अनुदान मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे फरक बिल, वैद्यकीय बिले, इतर फरकाची बिले, अंशतः अनुदानित शाळांचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, वेतन पथक कार्यालयात विविध प्रस्ताव, बिले, नियमितपणे स्विकारुन तशी ओसी देणे, डी.सी.पी.एस. धारकांना वेळोवेळी हिशोब मिळावा.
तसेच पी.एफ. च्या स्लिप मिळणे, गेल्या काही वर्षाच्या, महिन्यांच्या कालावधीपासून वेतन पथक कार्यालयात भविष्य निर्वाह निधी ना परतावा देयके, अंतिम प्रदान देयके कार्यालयात दाखल झाल्यापासून चार ते सहा महिन्यानंतर ती उशीराने पारित करणे, गेल्या तीन ते पाच वर्षापासून ठेव संलग्न विम्याचे लाभ न मिळणे, दरमहा नियमित देयकातून कपात झालेली एन.पी.एस वर्गणीची रक्कम तात्काळ एनपीएस लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग न करणे, नियमित वेतन देयक मिळणे आदी समस्यांवर चर्चा झाली.
यावेळी राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, नाशिक विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे, धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, सचिव नानाभाऊ महाले, कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, तालुकाध्यक्ष किरण मासुळे, जयवंत पाटील, रावसाहेब चव्हाण, सुधाकर पाटील, शैलेश धात्रक, दामोदर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.