Govind Namdev Befitting Reply To Shivangi Verma Over Last Year Viral Photo
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आणि खलनायक गोविंद नामदेव गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आजही तो चित्रपटांमध्ये एका दमदार खलनायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘रेड २’ मधून त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आली. ‘ओह माय गॉड’ चित्रपटामध्ये साकारलेल्या खलनायकाच्या पात्राप्रमाणेच ‘रेड २’मध्येही त्यांनी भूमिका साकारलीये. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारे गोविंद नामदेव सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. मागील काही काळापासून ७० वर्षीय गोविंद नामदेव ३१ वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Kaun Banega Crorepati मध्ये अमिताभ बच्चनची जागा घेणार सलमान खान? नवीन होस्टबाबत समोर आले अपडेट
शिवांगी वर्माने गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती गोविंद यांच्याबरोबर पोज देताना दिसत होती. या शेअर केलेल्या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. “प्यार की कोई उम्र नहीं होती, कोई सीमा नहीं होती” असे कॅप्शन तिने दिले होते. त्यामुळे या दोघांबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. अखेर गोविंद नामदेव यांनी याबद्दल मौन सोडले आहे. त्यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्वांचीच बोलती बंद केलेली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.
“हे रिअल लाईफ प्रेम नाही, तर रिल लाईफ आहे. “गौरीशंकर गोहरगंज वाले” नावाचा एक चित्रपट आहे. त्या चित्रपटाचं शूटिंग आम्ही इंदूरमध्ये करत आहोत. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात पडते. मी वैयक्तिकरित्या तरुण किंवा वृद्ध व्यक्तीच्या प्रेमात पडेन, असं या जन्मात तरी शक्य नाही.” असं कॅप्शन लिहित गोविंद नामदेव यांनी शिवांगीबरोबर त्यांचं नाव जोडून अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर प्रतिक्रिया दिली.
संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’मधून दीपिका बाहेर? ‘या’ कारणामुळे अभिनेत्री चित्रपटातून बाहेर
दरम्यान, गोविंद नामदेव यांनी स्पष्ट केलंय की ते व शिवांगी डेट करत नाहीयेत. दोघेही एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या पात्रांचा रोमँटिक अँगल आहे. याचा दोघांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध नाही.