भोजपुरी अभिनेता आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) अडचणीत सापडले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते मोठ्या वादात अडकले आहेत. एका महिलेने दावा केला आहे की ती रवी किशनची पत्नी असून दोघांना एक मुलगी आहे. अपर्णा ठाकूर असे या महिलेचं नाव असून ती रवि किशनला तिच्या मुलीचा हक्क देण्याची मागणी करत आहे.
[read_also content=”कार्तिक-तृप्तीनंतर कुणाल खेमू-झोया अख्तरने चमकीलाचं केलं कौतुक, म्हणाला- खूप छान चित्रपट… https://www.navarashtra.com/movies/after-kartik-aryan-zoya-akhtar-and-kunal-khemu-praise-chamkila-movie-nrps-524337.html”]
अपर्णा नावाच्या महिलेने लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये तिने सांगितले की ती रवि किशनची पत्नी आहे आणि दोघांचे लग्न मुंबईत 1996 मध्ये झाले होते, ज्यामध्ये त्यांचे दोन्ही कुटुंबीय आणि खास मित्रही उपस्थित होते. तिने सांगितले की, दोघांनाही एक मुलगी आहे. रवी किशनने तिला सामाजिकरित्या स्वीकारावे अशी तिची इच्छा आहे. रवी किशन यांनी तसे न केल्यास न्यायासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे महिलेने म्हटले आहे.
या कॉन्फरन्समध्ये तिची मुलगी देखील उपस्थित होती आणि तिने असा दावाही केला आहे की, रवी तिचे वडील आहेत आणि त्यांना भेटायलाही यायचे. ती म्हणाली की, तिला वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही, रवि किशन तिला भेटायला घरी जायचे आणि काही वेळाने परत जायचे, ते तिच्यासोबत राहिला नाही.
अपर्णाने सांगितले की, 1995 मध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना रवी किशन यांच्याशी तिची भेट झाली. वर्षभरानंतर दोघांचे लग्न झाले. अपर्णा म्हणते की रवी किशन अजूनही तिच्या संपर्कात आहे, परंतु हे नाते आणि त्यांची मुलगी सार्वजनिकपणे स्वीकारू इच्छित नाही.
या महिलेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, अभिनेता आणि राजकारणी रवी किशन यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अपर्णा यांच्याकडे त्यांच्या मुलीचा डीएनए अहवाल असून, ती घेऊन ती न्यायालयात जाणार असल्याचा दावा चित्रपट अभिनेता कमाल राशिद खान उर्फ केआरकेने केला आहे.