Aai Tulja Bhavani grand contest concludes grand winner gets to witness the grand aarti of Aai Tulja Bhavani devi
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्ट नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्टचे महा विजेते ठरले मुंबईचे विनोद तुकाराम राणे. या स्पर्धेत दर आठवड्याला विजेत्यांना देवी आईचा चांदीचा टाक देण्यात आला. विशेष म्हणजे, संपूर्ण कॉन्टेस्टमध्ये सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱ्या महाविजेत्याला केवळ चांदीचा टाकच नव्हे, तर थेट तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरात मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूजा काळे यांच्या सोबत देवीच्या महाआरती आणि दर्शनाचा अनोखा मान मिळाला.
‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ ऐकलंत का ? प्रेक्षकांना मराठी गाण्यात मिळणार हिंदी रॅपचा नवा धमाका!
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या अनुभवाबद्दल सांगताना पूजा काळे म्हणाली , “प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो, आणि माझ्या दर्शनाचा योग या महाविजेत्यांसोबत आला. मालिकेचे १०० हून अधिक भाग झाले आहेत, तुळजाभवानी आमची कुलदेवी असल्याने तिचं आणि माझं नातं खास आहे. इतक्या महिन्यानंतर आता या निमित्ताने मंदिरात जाण्याचा योग आला आणि मालिकेच्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
मी ह्या भूमिकेत इतकी स्वतः ला विसरून गेले आहे की तुळजापुरात पोहोचलो तेव्हा आगदी असं वाटत होतं की मी माझ्याच घरी आले आहे..तिथली सगळी श्रधाळू लोक पाहून वाटतं होता ही माझी लेकर आहेत.. खूप आपलस वाटत होता सगळं.. तिथून निघायची वेळ आली तेव्हा माझा पाय तिथून निघेनास झाला होता..खूप भरून आलं मनं. मी माझ्या घरापासून लांब जातेय असं वाटलं मला. खरंच देवीच्या आशिर्वादामुळे मी आज हे सगळं अनुभवू शकले. तिच जीवन अनुभवू शकले, जगू शकले. आणि आई तुळजा ने मला ही संधी दिली तिच आयुष्य जगण्याची ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे..कलर्स मराठीचे आभार, ज्यांनी मला हा अनमोल अनुभव दिला.”
लग्नाच्या ४ वर्षानंतर ‘मर्डर २’ फेम अभिनेत्री आई होणार, व्हिडिओ शेअर करत दिली ‘गुड न्यूज’
या भक्तिमय स्पर्धेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून, आई तुळजाभवानी मालिकेच्या चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला! तेव्हा पाहत राहा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९.०० वा आपल्या कलर्स मराठीवर.