murder 2 fame actress sulagna Panigrahi pregnant after 4 years of marriage
कॉमेडियन बिस्वा कल्याण रथ आणि अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही लवकरच आई- बाबा होणार आहेत. अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. बिस्वा आणि सुलग्नाच्या घरी लग्नाच्या चार वर्षांनंतर चिमुकला पाहुणा येणार आहे. या सेलिब्रिटी कपलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. त्यांनी ‘गुड न्यूज’ दिल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सुलग्ना पाणिग्रहीने टीव्हीसोबतच चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने इमरान हाश्मीच्या ‘मर्डर २’ चित्रपटात रेश्माची भूमिका साकारली होती.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली ५४,४५४ चौरस फूट जमीन, काय आहे कारण?
सुलग्ना पाणिग्रहीने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा पती दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्रीने आईबाबा होणार असल्याचं सांगत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. “नव्या पाहुण्याचं आगमन होत आहे… एक तर या आर्थिक वर्षी किंवा पुढच्या आर्थिक वर्षी”, असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिस्वा आणि सुलग्ना यांचे लग्न ९ डिसेंबर २०२० रोजी कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत झाले.
दरम्यान, सुलग्ना पाणिग्रहीने अनेक टेलिव्हिजन सीरियलमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक ब्लॉकबस्टर चित्रपट असलेला ‘मर्डर २’ मधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह सेलिब्रिटींनी आणि समीक्षकांनी खूप कौतुक केले. शिवाय सुलग्नाने अजय देवगणसोबत ‘रेड’चित्रपटातही काम केले आहे. ती अलिकडेच अनुपम खेर यांच्या ‘विजय ६९’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सुलग्नाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
दुबईत सोनं खरेदी केलं, स्वित्झर्लंडला जाते सांगितलं अन् भारतात आली; राण्या रावबद्दल DRI चा खुलासा
बिस्वा कल्याण रथ हा भारतातील सर्वात प्रसिद्ध विनोदी कलाकारांपैकी एक आहेत. त्याने त्याच्या ‘प्रिटेंशियस मूव्ही रिव्ह्यूज’ पुस्तकात सहकारी विनोदी कलाकार कानन गिल यांच्यासोबत विनोदी पद्धतीने चित्रपटांचे पुनरावलोकन करून लोकप्रियता मिळवली. त्याची स्टँड-अप कॉमेडी अनेकांना आवडते. याशिवाय, बिस्वा यांनी ‘लखों में एक’ नावाची वेब सिरीज तयार केली आहे आणि त्यात काम केले आहे.