Abhijeet Khandkekar to Host Chala Hawa Yeu Dya 2 Instead of Nilesh Sable
तब्बल १० वर्षे प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा शो पुन्हा एकदा नव्याने चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेले अनेक वर्षे हा शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. काही महिन्यांपूर्वीच हा शो ऑफ एअर झाला. ऑफ एअर झाल्यानंतर लवकरच या शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑडिशन होत आहेत. यंदाचा ‘चला हवा येऊ द्या’ सीझन पूर्णपणे वेगळा असणार आहे. प्रेक्षकांना अनेक नवनवीन झालेले बदल पाहायला मिळणार आहेत.
नसीरुद्दीन शाह यांच्यावर अख्खी इंडस्ट्री संतापली, ज्येष्ठ अभिनेते नेमकं काय म्हणाले ?
‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या सीझनमध्ये जो सर्वात मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे शोचा सुत्रसंचालक… ‘चला हवा येऊ द्या’ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर आपसुकच निलेश साबळे सगळ्यात आधी येतो. परंतु या सीझनमध्ये ‘चला हवा येऊ द्या’चं सुत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता अभिजित खांडकेकर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबद्दलचं वृत्त मुंबई टाईम्सने आज प्रसारित केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे हे कलाकार दिसणार आहेत.
आयफेल टॉवरसमोर अभिजीत सावंतने बायकोला केलं लिपलॉक, वाढदिवशी शेअर केले खास रोमँटिक Photos
तर, भाऊ कदम, सागर कारंडे आणि निलेश साबळे सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये दिसणार नाहीत. दरम्यान, अभिजीतने यापूर्वी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांचं, ट्रेलर लाँचिंग सोहळ्यांचं आणि प्रशासकीय कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे. आता त्यानंतर अभिनेत्यावर ‘चला हवा येऊ द्या’ या गाजलेल्या शोच्या दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे. अद्याप ‘चला हवा येऊ द्या’शोच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी अभिजित खांडकेकर घेणार असल्याचे वृत्त दिग्दर्शकांकडून आलेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. शिवाय, निलेश प्रमाणेच अभिजितलाही चाहत्यांकडून प्रेम मिळणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.