Kshitija Ghosalkar Poem On Pahalgam Terror Attack
काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ ला हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संतापाची लाट पसरली आहे. कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त भावना व्यक्त करून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अशातच अभिनेता प्रथमेश परबच्या पत्नीने युट्यूबवर पहलगाम हल्ल्यासंबंधित एक कविता शेअर केली आहे. क्षितिजा घोसाळकरने तिच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्षितीजा घोसाळकरची कविता सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली असून चाहते कौतुक करीत आहेत.
‘वामा – लढाई सन्मानाची’ स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणार; मोशन पोस्टर रिलीज
जे घडलंय त्यामुळे पहलगाम आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय की काय, अशी अनामिक भीती वाटतेय…
तुम्हाला ही ना?… हे सगळं आपल्याबाबतीत घडलं असतं तर, त्या पर्यटकांच्या जागी आपण असतो तर…
आपलाच भाऊ, वडील, काका किंवा आपलंच कुटुंब असतं तर…
माझ्यासारखे तुमच्याही मनात हे प्रश्न येऊन गेले असतील, एक नाही हजार वेळा….
हो ना? सुदैवाने प्रत्यक्षरित्या आपल्याबाबतीत काहीही झालं नाही, आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित आहोत,
पण आहोत का? काही शब्दांची ना आयुष्यभरासाठी भीती वाटतेय…
लाल रंग, धर्म, शांतता, मिनी स्वित्झर्लंड आणि पहलगाम,
काय आहे ना….लाल रंग बघितल्याशिवाय आपल्याला वस्तुस्थितीचं गांभीर्यचं कळतं नाही.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह, नवविवाहितेचं कायमचं पुसलं गेलेलं कुंकू,
तिच्या हातातील चुडा आणि रडून-रडून लाल होऊन शून्यात गेलेले ते डोळे…
हे सगळं बघितल्यानंतर आमची सुरक्षा व्यवस्था जागृक होते, मग आम्ही जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो,
तोपर्यंत हे आकडे वाढत जातात, या आकड्यांमागची हाडामासांची निष्पाप माणसं, त्यांचं कुटुंब कायम स्वरुपी उद्ध्वस्त होतात.
दोष कसला होता हिंदू असण्याचा?
मृत्यूच्या तावडीतून सुटण्यासाठी अल्लाह हू अकबर बोलण्याचा,
एका पत्नीने पतीसाठी आकांडतांडव करण्याचा की, पुन्हा आमच्या हिंदूचं असण्याचा,
केवळ हिंदू धर्म म्हणून सरळ आपल्याला गोळ्या घातल्या जातात,
बायको समोर तिचं कुंकू पुसलं जातं,
मुलीसमोर वडिलांना मारलं जातं आणि खतना झालाय की नाही हे पाहायला उघडंही केलं जातं…
हे ऐकून आताही रक्त खवळतंय ना, तळ पायाची आग मस्तकात जातेय ना,
काही नाही रिलॅक्स हे फार थोड्या दिवसांसाठी आहे, काय ती सुपरपॉवर आहे ना आपल्याकडे,
याआधी काही कमी हल्ले झालेत, मग तो २६/११ चा असो, संसदेवरचा असो, पुलवामाचा असो,
हल्ल्याच्या दुसऱ्याचं दिवशी स्पिरिट ऑफ मुंबई, स्पिरिट ऑफ इंडियाच्या नावाखाली पुन्हा जैसे थे.
जसं उत्तर आपण उरी हल्ल्यातून दिलं ना, तसंच उत्तर या हल्ल्यासुद्धा द्यायला हवं…
नाही, नको कारण भारताच्या ते शांततेला शोभणारं नाही,
कशाला अहो तो धर्म वगैरे, रमूयात ना आपल्या जातीपातीच्या लढाईत,
भाषेची लढाई तर आहेच सुरू, गावागावातील सीमाबद्दल आपण भांडत राहू, लढत राहू
आणि सीमेपलीकडून येऊन धर्म या एका शब्दावरून आपल्यावर बेछूटपणे वार करून ते पसारही होतील, तसे आता झाले तसेच…
बरं ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी नाहीच आहे,
तसं असतं तर दहशतवाद्यांच्या तावडीतून हिंदू पर्यटकांना वाचवणारी व्यक्ती पण मुस्लिम होती,
सुरक्षित स्थळी पर्यटकांना पोहोचवणारा घोडे चालकही मुस्लिम होता
आणि बाहेरचं वातावरण शांत होईपर्यंत आपल्या घरात राहू देणारे खाऊ-पिऊ घालणारे लोकंही कश्मिरी मुस्लिमच होते,
त्यामुळे लढाई आहे ती सडलेल्या विचाऱ्यांच्या दहशतवाद्यांची, या हल्ल्यानंतर काश्मिरला पर्यटकाचं येणं बंद होईल,
काश्मिरी अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, या मास्टरमाइंड गेमला काय म्हणायचं,
काय करायचं या परिस्थितीत, धर्म बदलायचा, हिंदू आहोत म्हणून गोळ्या खाऊन मरून जायचं ?
की काही दिवसांनी याचचं रुपांतर राजकारण्याच्या एका नवीन भागात होईल त्यात सामिल व्हायचं,
सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करून गप्प बसायचं, दहशतवाद्यांना दोन-चार शिव्या घालून शांत व्हायचं?
की काश्मीर जाणं बंद करायचं की पुन्हा दुसरा हल्ला बघण्याची वाट बघायची
ते आले, ते मारून गेले आणि आता आपण त्याच्याबद्दल बोलतोय, पण ते आलेच कसे?
इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी पर्यटक येतात, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कुठे होती?
कुठल्या राजकारण्याच्या सुरक्षिततेत बिझी होते की कुठल्या वीआयपीला अटेंड करत होते, याबद्दल चौकशी झाली?
काश्मीरला येणं बंद करू नका, तो आपल्याच देशाचा एक भाग आहे,
काही पर्यटक आता तिथे गेलेत सुद्धा, कारण आता जगात जितकी सिक्युरिटी नसेल ना, तितकी सिक्युरिटी पहलगाममध्ये असेल,
पण पुन्हा तेच ना, काही निष्पाप जीव गेल्याशिवाय आपल्याला सुरक्षिततेचं गांभीर्यचं कळतं नाही,
या प्रश्नावलीत उत्तर सापडतं नाहीये, ज्यावर गोळीबार झालाय त्याच्या कुटुंबियांचं,
अहो आता कितीही कठोर निर्णय घ्या, लाखो रुपयांची मदत करा, दिलासे द्या, श्रद्धांजली वाहा,
पण त्यांच्या घरातील त्या कर्त्या पुरुषाची जागा कोणतीच मदत कधीच रिप्लेस करू शकत नाहीय
आणि याच हल्ल्याचं पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आतातरी शांततेचं स्पिरिट बाजूला ठेवा आणि कठोर निर्णय घ्या,
केवळ महाराष्ट्रात ५ हजार २३ पैकी ५१ पाकिस्तानी नागरिकांकडे अधिकृत कागदपत्र आहेत, उरलेल्यांचं काय?
आपल्या आसपास असे कितीतरी लोक फिरत असतील ज्याची कल्पना सुद्धा नाहीये,
या आकडेवारीनंतर पुन्हा मनात शंकेची पाल चुकचुकली.
जे घडलंय त्यामुळे पहलगाम आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय की काय अशी अनामिक भीती वाटतेय. तुम्हालाही ना?
अभिजित सावंत म्हणतोय, ‘तुझी चाल तुरूतुरू’, तरूणाईसाठी नव्या ढंगात होणार पेश