Chala Hawa Yeu Dya Fame Sagar Karande Says He Will Not Play Female Character Anymore
‘चला हवा येऊ द्या’ शो ने खरंतर इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्यासह कॉमेडियन म्हणून ओळख दिली आहे. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे, डॉ. निलेश साबळे आणि तुषार देवल सह अनेक कलाकारांना या शोने प्रसिद्धी दिली आहे. शो मधील प्रसिद्ध कलाकार अभिनेता सागर कारंडे याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
Zapuk Zupuk Teaser: गोलीगत सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा अफलातून टीझर रिलीज, स्टाईलने वेधलं लक्ष
पोस्टमन काकांचे पात्र साकारणाऱ्या सागर कारंडे जेव्हा शोमध्ये पत्र घेऊन यायचा तेव्हा त्याचं भावनिक पत्र ऐकून सगळेच रडायचे. शिवाय, जेव्हा अभिननेता स्त्री पात्रांच्या वेशात मंचावर यायचा तेव्हा त्याच एनर्जीने तो प्रेक्षकांना हसवायचा. ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये पोस्टमन काका, पुणेरी बाईसह अनेक वेगवेगळ्या महिलांचे पात्र साकारणाऱ्या सागर कारंडेने आता कुठेही महिला पात्र साकारणार नाही, याची घोषणा केली आहे. ही घोषणा अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत केली आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हा निर्णय आपल्या चाहत्यांना सांगितला आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सागरने ल, “यापुढे स्त्री पात्र करणार नाही” असं लिहित जाहीर केलं आहे. सागरची ही पोस्ट पाहून त्याच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्याने अचानक हा निर्णय का घेतला असावा या विचारात त्याचे चाहते आहेत. नेमका अभिनेत्याने हा निर्णय का घेतला? यासाठी चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने आजारपणाच्या कारणास्तव शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आजारपणामुळे मनोरंजन विश्वापासून तो दूर होता. पण, त्यानंतर सागरने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. तब्येत बरी झाल्यावर त्याने बऱ्याच शोमध्ये, सोहळ्यांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून एन्ट्री घेतली होती.
अभिनेता सागर कारंडेने स्त्री पात्र साकारण्याचा निर्णय अचानक का घेतला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता अभिनेता या निर्णयावर त्याची बाजू केव्हा स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.