संजय दत्त हा अभिनेता गेल्या तीन दशकापासून प्रेक्षकांवर अधिराज्य करतो आहे. मधल्या काळामध्ये काही प्रकरणात सापडला आणि चित्रपटापासून लांब राहावे लागले त्यामुळे तो आता चित्रपटात दिसणार नाही असे वाटले होते पण अनेक राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन त्याची सुटका केली आहे. त्यामुळे तो पुन्हा चित्रपटात दिसायला लागलेला आहे. हे जरी खरे असले तरी वयोमानानुसार चित्रपट स्वीकाराचे हे त्याने ठरवलेले आहे. त्यामुळे इतर नायकांमध्ये जी स्पर्धा पाहायला मिळते ती त्याच्यात पाहायला मिळत नाही. ज्यात अभिनय आहे आणि प्रेक्षकांनी दखल घ्यावे अशा भूमिका तो करताना दिसत आहे.
‘आता कोणताही सण…’ नमाजबाबत मेरठच्या निर्णयावर संतापला मुनव्वर फारुकी, नेमकं काय प्रकरण?
खरंतर चित्रपटात येण्याविषयी त्याने फारसे काही ठरवले नव्हते परंतु वडील, अभिनेते, राजकीय नेते सुनील दत्त आणि आई, एक होते देतो ते अभिनेत्री नर्गिस यांनी चित्रपट सृष्टीमध्ये नाव मिळवले आहे म्हटल्यानंतर त्यांच्याच पावलावर टाकून तो चित्रपटात आला होता. सुरुवातीला चित्रपटात त्याचे दिसलेले व्यक्तिमत्व प्रेक्षकांना काही फारसे भावले नाही त्यामुळे त्याच्यात सातत्य राहील असे वाटले नव्हते परंतु त्याने नायकापासून तर ते खलनायकापर्यंत सर्वच भूमिका हे सर्वोत्तम होतील असे त्याने पाहिलेले आहे. असा हा संजूबाबा पुन्हा प्रेक्षकांचा ताबा घेण्यासाठी सज्ज झालेला आहे.
सुशांत सचदेव यांच्या लेखन, दिग्दर्शनात ‘द भूतनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे शिवाय पंचवीस कलाकारांना घेऊन ‘वेलकम टू जंगल’ याही चित्रपटांमध्ये तो महत्वपूर्ण भूमिका साकार करताना दिसणार आहे. सुभाष घई दिग्दर्शित, निर्मित गाजलेल्या ‘खलनायक’ याही चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्याच्यासोबतचे शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगन, सलमान खान, अक्षय कुमार हे सर्व स्वतः पुढाकार घेऊन आपल्या नावाचा गाजावाजा करीत असतात. त्यासाठी चित्रपटाची निर्मितीही करीत असतात परंतु संजयने आजवर तसे काही केले नाही. जे आले ते स्वीकारले आणि लोकप्रियतेचा सिलसिला सुरू ठेवला.