After Deepika Padukone, Pankaj Tripathi Calls For Reasonable Work Hours
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी याला आज काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. या बहुआयामी अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गेल्या दोन दशकांपासून अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे. एका मुलाखतीच्या माध्यमातून अभिनेत्याने केलेल्या एका वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एका मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठीने अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव न घेता कलाकारांच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीचं समर्थन केलंय.
हसा हसा आणि फक्त हसा! अशोक मामांचे सुपरहिट चित्रपट चाहत्यांना OTT वर पाहता येणार; वाचा यादी
गेल्या काही दिवसांपूर्वी आठ तासांच्या शिफ्टच्या वक्तव्यामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण चर्चेत आली होती. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ चित्रपटाच्या शुटिंग वेळी दीपिकाने फक्त ८ तास काम करण्याची मागणी केली होती. त्यामुळे दिग्दर्शकांनी दीपिकाच्या ऐवजी तृप्ती डिमरीची निवड करत तिला चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले. या चित्रपटासाठी तृप्ती १० कोटी घेणार आहे. तर दीपिकाने याच चित्रपटासाठी तब्बल २० कोटी रुपये मानधनाची मागणी केली होती, ज्याची खूप चर्चा देखील झाली होती.
‘हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठीने कलाकारांच्या कामाच्या अनिश्चित वेळेबद्दल आपलं मत मांडलं आहे. त्यादरम्यान, ते म्हणाले, “कलाकारांनी आपल्या कामाच्या मर्यादा ठरवायला शिकले पाहिजे. कामाचे तास निश्चित असले पाहिजेत. खरंतर, कलाकार कोणत्याही कामासाठी नकार देत नाही. पण त्यांनी नकार द्यायला शिकायला हवं. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामाच्या मर्यादा माहिती असाव्यात. त्यानंतर त्याने नम्रपणे म्हणायला हवं, धन्यवाद मित्रा, माझी काम करण्याची मर्यादा इथपर्यंतच आहे, मी यापुढे नाही करु शकत.”
खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग; मनोरंजन आणि मस्तीचा चाहत्यांना मिळणार जबरदस्त पॅकेज
त्यानंतर पंकज त्रिपाठीने आपल्या सिने करियरमधला कामाचा अनुभव सांगितला, “मी देखील सेटवर १६-१८ तास काम केलं आहे. कधीकधी असं वाटायचं की फक्त शरीर काम करत आहे. पण आता मी स्पष्टपणे नकार द्यायला शिकलो आहे. आपण त्यांच्यासोबत नम्रपणे वागलं पाहिजे, पण तरीही त्यांनी ऐकलं नाही तर एवढचं काम होईल, असं सांगताही आलं पाहिजे. शिवाय आजचं जे काही काम होतं ते पूर्ण झालं आहे, आता आपण उर्वरित काम उद्या करू.असं दिग्दर्शकाला सांगता आलं पाहिजे.” असं म्हणत त्यांनी दीपिकाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनीही दीपिका पदुकोणला पाठिंबा दिला. दरम्यान, शोशामध्ये चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की, “मला वाटते की दीपिकाची मागणी पूर्णपणे योग्य आहे. मला आनंद आहे की, ती याबद्दल विचारण्याच्या स्थितीत आहे. एक चित्रपट निर्माते म्हणून तुम्ही कास्टिंग करताना हे लक्षात ठेवले पाहिजे आणि हे विचारणे अजिबात चुकीचे नाही, तर ती सर्वात मोठी गरज आहे. मला वाटते की हे प्राधान्य असले पाहिजे आणि तुम्ही ते स्वीकारले पाहिजे. तुम्हाला ते चांगले समजून घ्यावे लागेल आणि त्याभोवती काम करावे लागेल.”
अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी गेल्या वर्षभरापासून कोणत्याही चित्रपटात काम केले नसल्याचा खुलासा केला. मुलाखतीदरम्यान सांगितले की, “मी शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे माझे वजन खूप कमी झाले. मी आठवड्यातून ६ दिवस २.५ ते ३ तास कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करत असतो. या काळात मी खूप प्रवासही केला. दीर्घ विश्रांती दरम्यान, मी १५ दिवस माझ्या गावात राहिलो आणि काही वेळ परदेशातही घालवला.”