‘दृश्यम 2’ चित्रपटाची कथा 2 आणि 3 ऑक्टोबरच्या रहस्यावर आधारित आहे. ज्यामध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अभिनेत्री तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि इशिता दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक पाठक दिग्दर्शित, दृश्यम 2, व्हायाकॉम18 स्टुडिओज प्रस्तुत आहे. गुलशन कुमार, टी-सीरीज आणि पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे तर भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाशिवाय अजय देवगणच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘थँक गॉड’, ‘लव रंजन नेक्स्ट’, ‘मैदान’, ‘भोला’ आणि ‘गोलमाल 5’ यांचा समावेश आहे.