Salman Khan To Play The Role Of An Army Officer Film To Be Made On The War In Galwan Valley
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला विशेष ओळखीची गरज नाही. कायमच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या भाईजानच्या चित्रपटांना सध्या अच्छे दिन पाहायला मिळत नाहीये. ‘किसी का भाई और किसी की जान’ आणि ‘सिकंदर’ हे दोन्हीही चित्रपट सलमान खानचे बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. गेल्या काही वर्षांपासून भाईजान आपली जादू दाखवण्यासाठी काही अंशी अपयशी होताना दिसत आहे. सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कायमच रोमँटिक हिरो आणि दमदार ॲक्शन करणारा भाईजान आता एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे.
Met Gala मध्ये ‘या’ भारतीयाला मिळाला सर्वोत्तम ड्रेसचा किताब, यादीत कुठेच नव्हते शाहरुखचे नाव
कायमच रोमँटिक आणि दमदार ॲक्शन साकारणारा सलमान खान आता लवकरच एका अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लद्दाखच्या गलवान खोऱ्यामध्ये, २०२० साली भारत आणि चीन सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीमध्ये दोन्ही देशांचे अनेक सैनिक मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४ वर्षे उलटून गेले असून आता चार वर्षांनंतर गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या युद्धावर चित्रपट येणार आहे. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, अपूर्व लखिया त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पुढचे पाच महिने भाईजान त्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र असणार आहे.
लद्दाखच्या गलवान खोऱ्यामधील झालेल्या युद्धावरील चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. या वॉर ड्रामा चित्रपटामध्ये सलमान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत असणार आहे. सलमानने हा सिनेमा साईन केला असून लवकरच त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सलमान खान लवकरच संजय दत्तसोबत ‘गंगाराम’ सिनेमात दिसणार आहे. शिवाय ‘बजरंगी भाईजान २’ सुद्धा सुरु होणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय सलमान दिग्दर्शक ॲटलीसोच्याही चित्रपटात काम करताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, सलमानला ‘बजरंगी भाईजान २’चंही शूट करायचं आहे.
पण, कबीर खान या चित्रपटापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची इच्छा नाही. मात्र सलमानला कबीर खानच दिग्दर्शक म्हणून हवा आहे. ‘सिकंदर’नंतर, सलमानकडे अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स आल्या होत्या. पण, त्यामध्ये अभिनेत्याला गलवान खोऱ्याचीच कहाणी भावली. २०२०- २१ साली लद्दाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. दिग्दर्शक अपूर्व लखिया लवकरच शूटिंग शेड्युल फायनल करणार आहे. त्यानंतर सलमान या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र होणार आहे. लद्दाखमध्ये चित्रपटाचं शूट होणार असून सलमान खान स्वत: या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.