अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि अनिल कपूर यांची (Anil Kapoor) प्रमुख भूमिका असलेला अॅनिमल (Animal) सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे चित्रपटाच्या अॅडवान्स बुकींगचे आकडे. रणवीरची तगडी फॅन फॅालोविंग पाहता या सिनेमाने रिलीजआधीच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. अॅनिमलने रिलीजआधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई (Animal Advance Booking)केली आहे.
[read_also content=”विक्रांत मेस्सीचा ’12वी फेल’ ऑस्करच्या शर्यतीत! 2024 मध्ये होणाऱ्या पुरस्कारासाठी एंट्री https://www.navarashtra.com/movies/vikrant-messy-12th-fail-entry-in-oscars-2024-nrps-484058.html”]
अॅनिमल सिनेमा येत्या 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. खरंतर सिनेमाच्या फर्स्ट लूक पासूनच चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल चांगलीच उत्सुकता होता आता ट्रेलर समोर आल्यानंतर ही उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. अॅनिमलमधील रणबीरच्या लूकची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. त्याचा फायदा म्हणजे पण रिलीजआधीच या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्याची कमाल केली आहे. अॅनिमलने रिलीजआधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. ‘अॅनिमल’ या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 6.4 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल दोन लाख तिकीट विकले गेले आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतील तिकीट विकले गेले आहेत.
या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भुमिका आहेत . तर अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे संदीप रेड्डी वांगा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेता बॅाबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूरच्या लूकसोबतच प्रेक्षकांना बॅाबी देओलच्या लूकही प्रंचड भावला आहे. या निमित्ताने बॅाबी देओलचं धमाकेदार कमबॅक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा येत्या 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.