अंकिता लोखंडे बिग बॉस 17 मध्ये दिसल्यापासून ती लाइमलाइटचा एक भाग राहिली आहे. या शोमध्ये ती पती विकी जैनसोबत सहभागी झाली होती. या रिॲलिटी शोमध्ये दोघांमध्ये बरीच भांडण पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या बिझनेसमन पतीसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. नुकतेच अंकिताने या म्युझिक व्हिडिओचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. हे जोडपे आता बिग बॉसनंतर पुन्हा एकदा धमाका करायला सज्ज झाले आहे.
कपलचा फर्स्ट लुक
अंकिता लोखंडेने शनिवारी तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर तिच्या गाण्याचे पहिले पोस्टर शेअर केले, ज्यामध्ये तिचा फर्स्ट लुक देखील समोर आला आहे. ‘ला पिला दे शराब’ असे या म्युझिक व्हिडिओचे नाव आहे. ‘ला पिला दे शराब’ची रिलीज डेट अद्याप कळलेली नसली तरी अंकिता-विकीचे हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे.
पोस्टरमध्ये अंकिता लोखंडे एका बाजूला अनारकली सूट घालून बसलेली दिसत आहे. तर दुसरीकडे तिचा नवरा विकी जैन बसून तिच्याकडे बघत आहे, त्याच्या हातात ग्लास आहे. विक्कीने काळी पँट आणि स्काय शर्ट घातला आहे. हे पोस्टर चाहत्यांना मुघल-ए-आझम चित्रपटाची आठवण करून देईल. हे शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ला पिला दे शराब’ लवकरच तुमचा आत्मा मोहित करण्यासाठी सज्ज आहे. गायक विशाल मिश्राने ‘ला पिला दे शरब’ला आपला आवाज दिला आहे. तर, ते मनन भारद्वाज यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वीच विकीने एका मुलाखतीत आपली इच्छा व्यक्त केली होती की, त्याला अंकितासोबत गाणे करायचे आहे आणि आता त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.