'सिंकदर'च्या सेटवरचे फोटो व्हायरल, धमक्यांदरम्यान रश्मिका मंदान्नासोबत सलमान खान करतोय शुटिंग
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सिकंदर’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. १८ जूनपासून त्याच्या ह्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘गजनी’ दिग्दर्शक ए आर मुरुगोदास हे ‘सिकंदर’चं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खान ॲक्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. सध्या ह्या चित्रपटाची शुटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. हैदराबादमधील शुटिंग दरम्यानचे फोटोज आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.
हे देखील वाचा – ‘वेलकम होम’ सिनेमा पाहायला का? सत्य घटनेवर आधारित चित्रपट
गेल्या अनेक दिवसांपासून भाईजान चर्चेत राहिला आहे. सलमानला पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकीचा मेसेज आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला सतत धमकीचे फोन कॉल्स, मेसेज आणि ई- मेल येताना पाहायला मिळत आहे. धमकीच्या सावटामध्ये भाईजान शुटिंग करत असून शुटिंग दरम्यानचे काही फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. सलमान आणि रश्मिका हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये ‘सिकंदर’ चित्रपटाची शुटिंग करीत आहे. शुटिंगच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही फॅन्स शुटिंगच्या इथले फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करताना दिसत आहे. शुटिंगच्या इथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त एकीकडे आणि फॅन्सची गर्दी एकीकडे पाहायला मिळत आहे.
#Sikandar shoot in Hyderabad Falaknuma palace 🎬🔥🔥
Royal celebration scenes getting filmed here 📽️🏯👑 #SalmanKhan #EID2025 pic.twitter.com/ZbsTzo7ZEm
— Mohammed Sohail ♐ (@ItsSohailM) November 4, 2024
व्हायरल व्हिडिओमध्ये, ‘सिकंदर’ चित्रपटाचा सेट पाहायला मिळत असून क्रू मेंबर्ससुद्धा पाहायला मिळत आहे. शिवाय शुटिंग कशा पद्धतीने होतेय, हे सुद्धा पाहायला मिळत आहे. स्क्रिनवर चाहत्यांना रश्मिका मंदान्ना पाहायला मिळत असून सलमान खान कुठेच दिसत नाही. सलमान खानही तिथेच आसपास शुटिंग करत असल्याचे बोललं जात आहे. फॅन्सच्या म्हणण्यानुसार, सलमान आणि रश्मिका हैदराबादमध्ये चित्रपटातला महत्त्वाचा सीन शूट करत असल्याचं बोललं जात आहे. चित्रपटाच्या सेटवरून आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान चाहत्यासोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. सलमानचा आणि त्याच्या फॅनचा फोटो ‘सिंकदर ईद २०२५’ या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
Exclusive video from the set of #Sikandar #SalmanKhan @BeingSalmanKhan @iamRashmika @MsKajalAggarwal
— 𝐁𝐄𝐈𝐍𝐆 𝐓𝐈𝐆𝐄𝐑…🐅!!! (@Only4Salman27) November 4, 2024
#Sikandar today. #SalmanKhan pic.twitter.com/KTVRKl7baG
— Sikandar | Eid 2025 (@SikandarVerse) November 4, 2024
दरम्यान, अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगने पुन्हा एकदा जीवे मारण्याची आज धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या कंट्रोलरुमला हा मेसेज आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई बोलत असल्याचे सांगत त्याने ही धमकी दिली आहे. “अभिनेता सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावेत. न दिल्यास सलमान खानला जीवे मारू, आमची गँग आजही सक्रिय आहे.” अशी धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या मेसेजची दखल घेत गुन्हा दाखल केला असून त्याचा शोधही सुरू केला आहे.