बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमधील अनेक स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. हा सीझन सप्टेंबर २०२१ मध्ये पार पडला होता. बिग बॉस मराठी फेम मीनल शाह सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या घरामुळे चर्चेत आलेली मीनल सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री मीनल शाहने गुपचूप गोव्यामध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव तथागत पुरुषोत्तम असं असून तिने लग्ना दरम्यानचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
Bigg Boss Marathi 3 Finalist Meenal Shah Ties The Knot With Beau Tathagat Purushottam
अभिनेत्री मीनल शाह बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. त्यानंतर ती फार कुठे दिसली नाही, पण आता ती एका खास कारणामुळं चर्चेत आली आहे. मीनलने गुपचूप लग्नगाठ बांधत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या मीनल शाहने आज (१८ फेब्रुवारी) रोजी गोव्यात गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. "दोन सुंदर संस्कृती एकत्र साजरे करत आहोत" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
"आय लव्ह यू तथागत, प्रियजनांकडून मिळालेल्या प्रेम आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मनापासून आभार, मला खूप काही सांगायचे आहे. पण मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत." असं ती शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. मीनल आणि पुरुषोत्तमच्या लग्नाला मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते.
लग्नामध्ये मीनलने पिवळ्या कलरची साडी, रेड कलरचा ब्लाऊज असा मराठमोळा लूक तिने केलेला दिसत आहे. तर अंगावर शाल घेऊन तिने आपला पूर्ण लूक केलेला आहे. या स्पेशल मुव्हमेंटमध्ये मीनल खूपच सुंदर दिसत होती. तर, तथागत पुरुषोत्तम म्हणजेच मीनलच्या पतीने लग्नामध्ये व्हाईट कलरचा कुर्ता, गोल्डन कलरची धोती आणि ओढणी वेअर केलेली होती. दोघेही पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते.
मीनल आणि पुरुषोत्तमने दोन वेगवेगळ्या संस्कृतीतून लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना लग्नाची कोणतीही चुणूक न लागू देता गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून बाहेर आल्यानंतर सहसा मीनल फारशी चर्चेत आली नाही. तिने गेल्या काही दिवसांपूर्वीच गोव्यात अलिशान बंगला बांधलाय. आता त्यानंतर गोव्यातच अभिनेत्रीने आपल्या पतीसोबत लग्नगाठ बांधली आहे.