अखेर अक्षय केळकरने गर्लफ्रेंड ‘रमा’चा चेहरा दाखवलाच, अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ची सर्वत्र ओळख आहे. ‘बिग बॉस’ शो फक्त हिंदीतच नाही तर मराठीसह वेगवेगळ्या भाषांमध्येही टेलिकास्ट होताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व पार पडलं. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता चर्चेत आला आहे. तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अक्षयने अभिनयासोबतच उत्तम निवेदनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या हरहुन्नरी अक्षय केळकरने अखेर गर्लफ्रेंड ‘रमा’ला आपल्या चाहत्यांसमोर आणलं आहे. नुकताच अभिनेत्याने ‘रमा’बरोबर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण! अभिनेत्रीने खास नवऱ्यासाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट…
अक्षय केळकरने बिग बॉस मराठीच्या घरात असताना गर्लफ्रेंड रमाचा खुलासा केला होता. बिग बॉस संपून दोन वर्ष झाली असली तरीही अक्षयने नेमकी रमा कोण? ती काय करते? याबद्दल सांगितलं नव्हतं. अखेर अक्षयने इन्स्टाग्रामवर रमासोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. अक्षयने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर रमाचा चेहरा दाखवलेला व्हिडिओ शेअर केला आहे. मारवा गाण्याचा वापर करत अक्षयने रमासोबतचा खास रोमँटिक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना अक्षयने कॅप्शन दिले की, “तर ही माझी रमा… उद्या (२३ डिसेंबर) आम्हाला १० वर्ष पूर्ण होतायत… म्हटलं एक दिवस आधीच सांगाव… म्हणून… बापरे, फाइनली सांगतोय मी… पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे… आणि आता आम्हीही.” असं कॅप्शन देत अक्षयने ‘रमा’बरोबरचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये, अक्षय आणि ‘रमा’एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्यानंतर तो ‘रमा’च्या केसात मोगऱ्याचा गजरा माळताना पाहायला मिळत आहे आणि दोघांच्या मागे जसराज जोशीच्या आवाजातील ‘मारवा’गाणं ऐकू येत आहे. अक्षयची ‘रमा’ पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अक्षयच्या ‘रमा’बद्दल सांगायचं तर, तिचं मूळ नाव साधना काकतकर आहे. साधना पेशाने गीतकार आणि गायिका आहे. साधनाने गायलेली आणि लिहिलेली गाणी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. साधनाने सावनी रवींद्र, मंगेश बोरगावकर अशा अनेक लोकप्रिय गायकांसोबत काम केलंय. साधना आणि अक्षय दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जातंय.
आगामी ‘संगीत मानापमान’ चित्रपटात अमृता दिसणार पाहुणी कलाकार!