“दफन करून आलास ना त्याला...”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
पंजाबी गायक बी प्राक(B Praak)ने त्याच्या ‘सारी दुनिया जला देंगे’, ‘मन भरिया २.०’ या गाण्यांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये गायक प्रसिद्ध झाला. सध्या बी प्राक त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच बी प्राकने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, त्याच्या नवजात बाळाचे २०२२ मध्ये निधन झाले होते. त्याचा जन्म होताच बाळाचा मृत्यू झाला होता. मुलाखतीमध्ये गायकाने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यावेळी तो भावुक झाल्याचे पाहायला मिळाला.
हे देखील वाचा- मतदान करा, ५० टक्के सूट मिळवा; ‘पाहिले न मी तुला’ नाटकाची खास ऑफर
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत बी प्राकने सांगितले की, “मला माझ्या आयुष्यात सर्वात जड काय वाटलं असेल, तर माझ्या मुलाला उचलणं… इतका भार एवढ्याशा बाळाचा यापेक्षा जड गोष्ट मी माझ्या आयुष्यात केव्हाच उचलली नव्हती. माझ्या मुलाच्या निधनानंतर महिन्याभरातच माझ्या वडिलांचे निधन झाले. आणि त्यानंतर २०२२ मध्ये माझ्या दुसऱ्या मुलाचं निधन झालं. मला कळतंच नव्हतं मी माझ्या पत्नीला कसं काय समजवू. मी तिला सांगितलेलं की, टेंशन घेऊ नकोस डॉक्टर आहेत, ते बाळाला चेक करत आहेत. ही गोष्ट माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट ठरली होती.”
पुढे मुलाखतीत बी प्राक म्हणाला, “मी जेव्हा पुन्हा दवाखान्यात गेलो तर मीरा माझ्याकडे पाहून म्हणाली, “दफन करून आलास ना त्याला, मला दाखवायचं तरी” तो खूप वाईट काळ होता. आम्ही आमच्या आयुष्यातील सगळे काही गमावले. खूप नकारात्मकता आली. ज्या पद्धतीने मी ती परिस्थिती हाताळली, त्यामुळे माझी पत्नी आजपर्यंत माझ्यावर नाराज आहे”, असे म्हणत बी प्राकने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, मीरा आणि बी प्राकने ४ एप्रिल २०१९ ला लग्नगाठ बांधली होती. २०२० मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला.