lauren gottlieb dance group dance on chhaava movie song aaya re toofan in front of new york times square
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरु आहे. देशासह परदेशातल्याही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही आवर्जुन गर्दी करत आहेत. चित्रपटाने देशभरात ४४७ कोटींची कमाई तर, जगभरात ६०० कोटींहून अधिकची कमाई ‘छावा’ चित्रपटाने आतापर्यंत केल्याचं म्हटलं जात आहे.
अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये परदेशी कलाकारांनाही ‘छावा’चित्रपटातील ‘आया रे तुफान…’ गाण्याची भुरळ पडलीये. व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. सोशल मीडियावर चर्चेत आलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
नामदेव ढसाळांची अवहेलना करणाऱ्यांवर संतापला हेमंत ढोमे, अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध डान्सर लॉरेन गॉटलीबने अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरजवळील एक व्हिडिओ शेअर केला होता. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत २० डान्सर्सच्या टीमने ‘छावा’ चित्रपटातील ‘आया रे तुफान…’ गाण्यावर अफलातून डान्स केलेला आहे. तिच्यासोबत डान्समध्ये रोहित गिजारेचीही टीम पाहायला मिळत आहे. लॉरेन्स आणि रोहितची मिळून एकूण २०ची डान्सर्सची टीम आहे. या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या डान्सचं नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होतं आहे.
दोन मिनिटांच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्व डान्सरने एका पेक्षा एक जबरदस्त डान्स स्टेप्स करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. टाइम्स स्क्वेअरजवळील डान्सर्सच्या या व्हिडीओला आतापर्यंत २.९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखांहून अधिक जणांनी लाइक केलं असून ४ हजारांहून अधिक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. याआधीही टाइम्स स्क्वेअरवर ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर झळकला होता. तो व्हिडीओही मेडॉक प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता.
बिपाशा बासूला काम का मिळत नाहीये? मिका सिंगने जरा स्पष्टच सांगितलं…
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाने १६ दिवसांत जगभरातल्या कमाईमध्ये ५६६ कोटींची कमाई केली आहे तर देशभरात ४४७ कोटींची कमाई करीत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने महाराणी येसूबाईंच्या भूमिका साकारली आहे. चित्रपटात विकी-रश्मिकासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनीत सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्त, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये अशा बरेच कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.