फोटो सौजन्य - Social Media
मुंबई: झुरिच मीडिया हाऊस एलएलपी निर्मित ‘Love You Loktantra’ हा हिंदी चित्रपट येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता DD National वर प्रदर्शित होणार आहे. समकालीन भारतीय राजकारणावर आधारित हा चित्रपट व्यंग, विनोद आणि वास्तववादाचा सुरेख संगम सादर करतो. सरकार स्थापनेभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे.
चित्रपटाची कथा एका महिला मुख्यमंत्री, एक पुरुष वकील आणि एक महिला वकील यांच्या सत्तासंघर्षाभोवती फिरते. सरकार स्थापनेची गुरुकिल्ली असलेले दोन अपक्ष आमदार अचानक बेपत्ता झाल्यानंतर कथा अधिकच रंगतदार होते. या घटनेनंतर राजकीय डावपेच, रणनीती आणि मानसिक खेळ यांचा थरारक प्रवास सुरू होतो, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढते.
या चित्रपटात Ravi Kishan, Isha Koppikar, Sneha Ullal, Manoj Joshi, Ali Asgar आणि Krushna Abhishek यांसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय सपना चौधरी, सुधीर पांडे, दयाशंकर पांडे आणि सुहासिनी मुळ्ये यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन Abhay Nihalani यांनी केले असून संगीत Lalit Pandit यांनी दिले आहे. गाण्यांना Amruta Fadnavis, Daler Mehndi, Abhijeet Bhattacharya, Shaan आणि Pratibha Baghel यांनी आवाज दिला आहे, ज्यांना आधीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटातील अभिनेता अमित कुमार यांनी डीडी नॅशनलवरील प्रीमियरबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, हा चित्रपट देशभरातील मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. राजकारणावर आधारित वेगळ्या शैलीतील हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘ना जाने क्यू धडकता दिल‘
या चित्रपटातील ‘ना जाने क्यू धडकता दिल‘ या गाण्याला महाराष्ट्राचे Mrs. मुख्यमंत्री अमृता फडणवीसांनी आवाज दिला आहे. तसेच त्यांचे Co – Singer सुप्रसिद्ध गायक शान आहे. या गाण्यामध्ये Ameet Kumar आणि Sneha Ullal दिसून येत आहे.






