(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी ‘बी हॅपी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. खरंतर, अभिषेक बच्चन आणि इनायत वर्मा अभिनीत ‘बी हॅपी’ चित्रपटाची रिलीज डेट आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील रिलीज केले आहे. जे पाहून चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ‘बी हॅपी’ हा चित्रपट १४ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असल्याचे समजले आहे. ‘बी हॅपी’ ही एक समर्पित एकटे वडील शिव (अभिषेक बच्चन) आणि त्याची उत्साही, हुशार मुलगी धारा (इनायत वर्मा) यांच्यातील अतूट बंधनाची कथा आहे. तिच्या वयापेक्षा खूपच हुशार असलेली धारा देशातील सर्वात मोठ्या डान्स रिॲलिटी शोच्या मंचावर सादरीकरण करण्याचे स्वप्न पाहते. आणि तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे वडील तिला मदत करत असतात.
अशी आहे चित्रपटाची कथा
जेव्हा एक खलनायक त्या स्वप्नाला चकनाचूर करण्याची धमकी देतो आणि शिव आपल्या मुलीचे स्वप्न वाचवण्याच्या मोहिमेवर निघतो तेव्हा परिस्थिती बिघडते. आपल्या मुलीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी तो आपल्या नशिबाला आव्हान देतो. हा चित्रपट प्रेक्षकांसमोर वडील आणि मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी सादर करणारा आहे. याची कथा नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे.
काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?
चित्रपटातील कलाकार
हा चित्रपट भारत आणि २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, नोरा फतेही आणि इनायत वर्मा मुख्य भूमिकेत आहेत तर नासिर, जॉनी लिव्हर आणि हरलीन सेठी हे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ओटीटीवर १४ मार्च रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.