(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘कांतारा २’ च्या चित्रीकरणादरम्यान एका ज्युनियर कलाकाराच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे. तसेच निर्माता ऋषभ शेट्टी आणि प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आवाहन केले आहे. आता चित्रपट रिलीज होण्याआधीच अडचणीत अडकला आहे. खरंतर, ‘कंतारा २’ चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटकातील कोल्लूर येथे सुरू होते. आणि याचवेळी चित्रपटाच्या सेटवर ज्युनियर आर्टिस्ट एमएफ कपिल यांचे ६ मे रोजी निधन झाले. कलाकाराच्या मृत्यूचे कारण नदीत पोहताना बुडणे असल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत कोल्लूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
‘किंमत मोजावी लागेल…’, कन्नड चित्रपट निर्माते सोनू निगमवर संतापले, घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
घटनांबद्दल AICWA चिंतेत
चित्रपटाच्या सेटवर होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांबद्दल AICWA ला खूप चिंता आहे. याबाबत, AICWA ने ‘कांतारा २’ च्या सेटवर घडलेल्या अलीकडील घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने म्हटले आहे की, ‘इंडियन २’ आणि ‘सरदार २’ या तमिळ चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान AICWA तंत्रज्ञांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बसने प्रवास करणाऱ्या २० कनिष्ठ कलाकारांचा अपघात सातत्याने चुकीचा दाखवला जात आहे. निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस अनेकदा अशा घटनांची तीव्रता कमी लेखतात आणि दिशाभूल करणारी माहिती देतात. या घटनेत, मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
Media Release
Date: May 8, 2025Subject: AICWA Demands Impartial Investigation into the Tragic Death of Junior Artist MF Kapil on the Set of “Kantara 2 (Chapter-1)”
Mumbai – The All Indian Cine Workers Association (AICWA) expresses deep sorrow over the tragic demise of junior… pic.twitter.com/QTDR0wU4v9
— All Indian Cine Workers Association (@AICWAOfficial) May 8, 2025
AICWA ने गंभीर प्रश्न उपस्थित केले
AICWA ने पुढे लिहिले की, ‘आमचा असा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा एखादा कामगार चित्रपटाच्या सेटवर आपला जीव गमावतो तेव्हा खरे कारण अनेकदा लपवले जाते आणि जो कोणी कामगार सत्य उघड करण्याचा प्रयत्न करतो त्याला घाबरवले जाते. अशा दुःखद घटनांमागील सत्य लपवण्याची ही पद्धत बंद झाली पाहिजे.’ असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी
एआयसीडब्ल्यूएने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे एमएफ कपिलच्या मृत्यूची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच निर्माता ऋषभ शेट्टी आणि प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. याशिवाय, AICWA ने ‘कांतारा २’ च्या निर्मात्यांना एमएफ कपिलच्या कुटुंबाला १ कोटी रुपये भरपाई देण्याचे आवाहन केले आहे.