जगभरातील कोणत्याही कानाकोपर्यातील माणसं व्हाट्सअँपद्वारे सहज कनेक्ट होऊ शकतात. एकमेकांना कॉल्स आणि मॅसेजेस करू शकतात. या अँपमध्ये अनेक फीचर्स तुम्हाला पाहायला मिळाले असतील. एकदा मॅसेज तुम्हाला गुपित ठेवायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तसेच, जर तुम्हाला लांच्या व्यक्ती सोबत संपर्क साधायचा असेल तर तुम्ही कॉल किंवा त्या व्यक्तीला बघण्यासाठी व्हिडीओ कॉलदेखील करू शकता इतके या अँप्सचे फीचर्स वापरकर्त्यांना साधे आणि उपयोगी आहेत. व्हाट्सअँप या अँपवर तुम्ही तुमचे स्वतःचे कॅनल देखील तयार करू शकता जेणे करून तुमचे लोकांसोबतचे नाते आणि संवाद वाढतील. याच फीचर्सचा वापर करून आपला लाडका अभिनेता अमेय वाघ त्याच्या चाहत्यांसोबत घट्ट नाते निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अमेयने चाहत्यांच्या हृदयाच्या जवळ यावे म्हणून स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. असे करणारा मराठी सिनेसृष्टीतील अमेय वाघ हा पहिलाच कलाकार ठरला आहे. त्यामुळे इथून पुढे चाहत्यांना अमेयचे आगामी प्रोजेक्ट्स आणि प्रदर्शनाच्या तारखा आता एका क्लिकवर समजणार आहे. तुम्ही सुद्धा हे व्हाट्सअँप चॅनलला फोल्लोव करू शकता. यावर अमेयच्या सगळ्या चित्रपटांची माहिती तुम्हाला सहज मिळून जाईल. अमेयच्या या हुशारीची चर्चा आता त्याच्या चाहत्यांमध्ये होताना दिसत आहे. ते नक्कीच या चॅनेलला प्रतिसाद देतील ही आशा आहे.
हे देखील वाचा – निर्माता कृष्णा कुमार यांची मुलगी तीशाचे २१ व्या वर्षी निधन, कर्करोगाशी देत होती झुंज!
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो. कामाच्या आघाडीवर, काला पानी, असूर यांसारख्या हिंदी वेबसीरिज, तर दिल दोस्ती दुनियादारी सारखी लोकप्रिय मालिका त्यांनी केले आहे. यानंतर त्याने फास्टर फेणे, मुरांबा, धुरळा यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही अमेयचे अनेक प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत. त्याबद्दल अमेय सोशल मिडियावर चाहत्यांशी नेहमी संवाद साधताना दिसत असतो. आता याचदरम्यान तो संवाद व्हाट्सअँपवर देखील साधणार आहे आणि लोकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत.