(फोटो सौजन्य - x अकाउंट)
विनोदी कलाकार आणि अभिनेता विराज घेलानी यांच्या आजीचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी अभिनेत्री रूपाली गांगुलीने सोशल मीडियावर शेअर केली. ‘अनुपमा’ स्टारने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर विराजच्या आजीसोबतचा तिचा अलीकडील फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये तिने आजीला श्रद्धांजली वाहिली आणि लिहिले, “तुमची आठवण सदैव येईल”. असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
विराजच्या व्हिडिओंमध्ये अनेकदा दिसणाऱ्या विराजच्या आजी रुपाली गांगुलीच्या अनुपमाच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या आणि अलीकडेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, विराजने त्यांची रुग्णालयात भेट घेतली आणि तेव्हा विराजने हे भावनिक क्षण शेअर केले. रुपाली आजीसोबत वेळ घालवतानाचे अनेक मार्मिक फोटो पोस्ट केले आहेत.
ड्रग्ज खरेदी आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याला अटक, नेमकं काय प्रकरण?
विराज घेलानीची आजी ‘अनुपमा’ची सर्वात मोठी चाहती होती
एकदा विराज घेलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात रुपाली गांगुली आजीला भेटण्यासाठी विराज घेलानीच्या घरी येताना दिसली. दोघेही खूप प्रेमाने भेटले आणि रूपाली गांगुलीने आजीचे हात खूप प्रेमाने चुंबन घेतले. या पोस्टमध्ये विराज घेलानीने लिहिले होते की, ‘रूपाली गांगुलीला कळताच की आजी बरी नाहीये, ती दररोज मला फोन करून तिची तब्येत विचारायची आणि सगळं ठीक आहे का ते पाहण्यासाठी आली आहे. शूटिंगमधून थोडा वेळ मिळताच ती कांदिवलीला घरी आली आणि आजीसोबत वेळ घालवला. नानी खूप आनंदी होती. ती तिच्या सुपर अभिनेत्रीला भेटण्यासाठी उत्सुक होती.’ असे लिहून त्याने पोस्ट शेअर केली.
‘Sardaar Ji 3’ वादावर दिलजीतने सोडले मौन, म्हणाला ‘चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सेन्सॉर…?’
नानीच्या निधनाने रूपाली गांगुली दुःखी
आता अनुपमा म्हणजेच रूपाली गांगुली हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराज घेलानीची ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच लिहिले आहे की, ‘नानी, मला तुझी खूप आठवण येईल.’ आता रूपाली गांगुलीची ही पोस्ट पाहून असे वाटते की तिला नानीच्या निधनाचे खूप दुःख झाले आहे आणि नानी तिच्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती. या दोघांचे नाते हृदयाशी जोडलेले होते. त्याच वेळी, आता नानी हे जग सोडून गेली आहे आणि रूपाली गांगुली निराश झाली आहे.