फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : सलमान खान होस्ट केलेला रिॲलिटी शो बिग बॉस 18 आता वेगाने प्रगती करत आहे. बिग बॉस 18 चा गेम रंजक होत आहे.स्पर्धकही जिंकण्यासाठी घरात बांधलेली नाती पणाला लावत आहेत. अशा परिस्थितीत या आठवड्याच्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान पूर्ण टेन्शनमध्ये दिसला. सलमानने घरातील सदस्यांचा आठवडाभर आढावा घेतला आणि त्यांना खडे बोल सुनावले. यावेळी सलमान खान वीकेंड के वारवर पॉडकास्ट केला यामध्ये सलमान खान विकेंडच्या वॉरमध्ये चाहत पांडेला घरामधील नात्यांवर प्रश्न उपस्थित करताना दिसला.
बिग बॉस 18 च्या संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सलमान खानने करणवीर मेहरा आणि शिल्पा शिरोडकर यांच्यामधील नात्यांवर त्यांनी सांगितले. त्याचबरोबर इशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्यामधील नात्यावर देखील प्रश्न उचलले. आता दरवेळेप्रमाणेच यावेळीही सलमानच्या निशाण्यावर घरातील एक नाही तर अनेक सदस्य आले. अशा परिस्थितीत होस्टने करणवीर मेहराला जे सांगितले ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
एकीकडे वीकेंड का वारमध्ये सलमान खानने शिल्पा शिरोडकर आणि करणवीर मेहरा यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. दुसरीकडे करणने घटस्फोटाबाबत जे सांगितले ते ऐकून करण स्वतःही चकित झाला. सलमानने करणला सांगितले की, ‘तू एवढा महान असतास तर पहिल्या पत्नीने तुला सोडले नसते आणि तुझी अशी अवस्था झाली नसती.’ हे ऐकल्यानंतर करणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
shame shame SHAME
Salman again went on #KaranveerMehra’s divorce! “Aap itne mahaan ho toh pahli wali aapko chhod ke na jaati aur aapki aisi haalat nahi hoti”
isn’t Vivian also divorced n remarried?? Why selective below the belt fr Karan??#BB18 #BiggBoss18 pic.twitter.com/RLPRguAJ1T
— rachit (@beingrachit_) November 30, 2024
सोशल मीडियावर सलमान खानची ही गोष्ट लोकांना पसंत नाही. युजर्सनी सलमानवरच प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, ‘विवियन डिसेना देखील घटस्फोटित आहे, तुम्ही त्याला असा प्रश्न का विचारत नाही?’ एकाने सांगितले, ‘तुझे भाऊ अरबाज आणि सोहेल यांनाही हाच प्रश्न विचारा.’ त्याच वेळी, बऱ्याच वापरकर्त्यांनी ते खूप चिप आहे असे म्हटले आहे.
या आठवड्यामध्ये आठ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, कशिश कपूर, तिजेंदर बग्गा, सारा खान, श्रुतिका अर्जुन, अविनाश मिश्रा हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यामध्ये कोणीही घराबाहेर जाणार नाही अशा बातम्या सध्या सुरु आहेत. कारण मागील आठवड्यामध्ये आलेल्या वाईल्ड कार्ड सदस्यांमध्ये अदिती मिस्त्रीला घराबाहेर काढण्यात आले होते.