Chhaava Ott Release Know When And Where To Watch Vicky Kaushal Rashmika Mandanna Movie
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या १९ व्या दिवशीही ‘छावा’चे कलेक्शन मजबूत राहिले आहे. मंगळवारी ‘छावा’ चित्रपटाचे कलेक्शन काय झाले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला असून, बॉक्स ऑफिसवर तो जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. तसेच या चित्रपटातील सगळी गाणी गाजत आहेत.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा ब्रेकअप ? लग्नाच्या चर्चांदरम्यानच चाहत्यांना मोठा धक्का
१९ व्या दिवशी ‘छावा’ची कमाई
सॅकनिल्कच्या मते, १९ व्या दिवशी, विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ने तिसऱ्या मंगळवारी ३ कोटी ४५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर गेल्या सोमवारी ‘छावा’ने एकूण ८ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. तसेच आता हा चित्रपटात आणखी किती कमाई करतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.
ऐतिहासिक चित्रपटांमध्ये ‘छावा’ जिंकला
‘छावा’च्या आधीही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनले आहेत. ‘छावा’ बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत एकूण ४७० कोटी ४५ लाख रुपये कमावले आहेत. तर पद्मावत चित्रपटाने एकूण ३०२ कोटी रुपये कमावले होते. ‘तान्हाजी’ चित्रपटाने २८० कोटी रुपये आणि ‘बाजीराव मस्तानी’ने १८४ कोटी रुपये कमावले होते. त्यानुसार, या सर्व चित्रपटांमध्ये ‘छावा’ने सर्वाधिक कमाई केली आहे. तसेच ‘छावा’ चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
प्रसिद्ध तेलुगू गायिकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, नेमकं कारण काय?
छावाची आतापर्यंतची कमाई
‘छावा’ने पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कल्ला केला. यानंतर, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण २१९ कोटी २५ लाख रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १८० कोटी २५ लाख रुपये कमावले. १५ व्या दिवशी, म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी, चित्रपटाने १३ कोटी रुपये कमावले. १६ व्या दिवशी, तिसऱ्या शनिवारी, चित्रपटाचा कलेक्शन २२ कोटी रुपयांवर पोहचले आहे. १७ व्या दिवशी, तिसऱ्या रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आणि चित्रपटाने २४ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. १८ व्या दिवशी, तिसऱ्या सोमवारी, चित्रपटाने ८ कोटी २५ लाख रुपये कमावले. आणि आता १९ व्या दिवशी, मंगळवारी, चित्रपटाने ३ कोटी ४५ लाख रुपये कमावले आहेत. एकूणच, चित्रपटाने आतापर्यंत ४७० कोटी ४५ लाख रुपये कमावले आहेत. याचदरम्यान आता ‘छावा’ हा चित्रपट लवकरच ५०० कोटींच्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट होईल.