(फोटो सौजन्य - x अकाउंट)
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत ‘छावा’ १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आणि आता, हा चित्रपट तेलुगू भाषेतही धमाल करण्यास सज्ज आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानावर आधारित या चित्रपटाच्या तेलुगू ट्रेलरवर आता एक अपडेट समोर आले आहे.
Chhaava: ४०० कोटीनंतर आता ५०० कोटी क्लबमध्ये होणार सामील; जाणून घ्या १६ व्या दिवसाची कमाई!
चित्रपटाचा तेलुगू ट्रेलर होणार रिलीज
गीता आर्ट्स डिस्ट्रिब्युशन आता हा हिट चित्रपट तेलुगू प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता उत्साह वाढवण्यासाठी, निर्मात्यांनी उद्या म्हणजे ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ट्रेलर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलुगू डबिंगच्या गुणवत्तेवर विशेष काम करण्यात आले आहे आणि तेलुगू राज्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा आहे.
या दिवशी हा चित्रपट तेलुगूमध्ये होणार प्रदर्शित
निर्मात्यांनी पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट ७ मार्च रोजी तेलुगू चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘छावा’ चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर ४३८.३१ कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, हा चित्रपट आधीच ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आता, हा चित्रपट ५०० कोटी रुपयांच्या कमाईकडे वाटचाल करत आहे.
कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायक डेव्हिड जोहानसेन यांचे निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
चित्रपटातील कलाकार
मॅडॉक फिल्म्स निर्मित, छावामध्ये रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि नील भूपालम यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटात आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती, तर दिव्याने सोयराबाईची भूमिका साकारली होती. चित्रपटाची कास्टिंग खूपच दमदार आहे. तसेच प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट उतरला आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडून, स्वतःचे अव्वल स्थान निर्माण केले आहे.