Chhaava Box Office Collection Day 29 Vicky Kaushal Movie Become Top 3 Most Earning Movie In Bollywood
विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट सातत्याने चांगली कमाई करत आहे. तसेच, त्याच्या वेगवान गतीने, ‘छावा’ ने अनेक चित्रपटांचे कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने थिएटरमध्ये दुसरा आठवडा पूर्ण केला आणि काल तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला. या चित्रपटाने १५ व्या दिवशी ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तसेच आता चित्रपटाने १६ व्या दिवशी काय कमाई केली हे आपण जाणून घेऊयात.
आले किती गेले किती संपले भरारा… कित्येक दशकांपासून अगदी तसाच आहे माधुरीच्या सौंदर्याचा दरारा
चित्रपटाचे कमाई
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये चंगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, छावाने १६ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ९.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तथापि, हे आकडे मागील दिवसाच्या कमाईपेक्षा कमी आहेत.
चित्रपटाची एकूण कमाई
काल, म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी, चित्रपटाने १३ कोटी रुपये कमावले आणि या कमाईसह तो ४०० कोटींच्या क्लबमध्येही सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. छावाची एकूण कमाई ४२२.१७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आता, हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता ‘छावा’ किती दिवसांत ५०० कोटींचा चित्रपट बनेल हे पाहणे बाकी आहे.
११ वर्षात हातावर मोजण्या इतके सुपरहिट चित्रपट; तरीही करोडोंचा मालक, राजेशाही थाटात जगतो टायगर श्रॉफ
‘केजीएफ २’ ला मागे टाकत ‘छावा’ ४०० कोटींचा हिट चित्रपट ठरला.
‘छावा’ चित्रपटाने १५ दिवसांत ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘छावा’ ने यशच्या ‘केजीएफ २’ ला या बाबतीत मागे टाकले आहे. ‘केजीएफ २’ ने २३ दिवसांत हा आकडा ओलांडला होता. त्याच वेळी, प्रभासचा ‘बाहुबली २’ देखील १५ दिवसांत या क्लबमध्ये सामील झाला. विशेष म्हणजे, ‘छावा’ हा मॅडॉक फिल्म्सचा या क्लबमध्ये सामील होणारा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी या प्रॉडक्शन हाऊसचा ‘स्त्री २’ हा चित्रपट या क्लबचा भाग बनला आहे.