(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अभिनेते धर्मेंद्र यांचे आज सोमवारी निधन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने बॉलीवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अभिनेत्याने आतापर्यंत त्यांच्या अभिनयकौशल्यावर चाहत्यांचे मन जिंकले आहे. आणि नवे रेकॉर्ड आणि पुरस्कार देखील जिंकले आहेत. धर्मेंद्र यांनी बॉलीवूड शोले, धरम वीर, सीता और गीता, यमला पगला दीवाना आणि लोफर असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त, धर्मेंद्र हे एक निर्माता आणि राजकारणी देखील होते. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक वेळा पुरस्कार मिळाले आहेत.
धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान
सिनेमातील योगदानाबद्दल धर्मेंद्र यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये, त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता. ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावावर मोठा विक्रम तयार केला.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
“घायल” हा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, ओम पुरी आणि अमरीश पुरी यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाला 1990 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला.
फिल्मफेअर पुरस्कार
१९९१ मध्ये धर्मेंद्र यांच्या ‘घायल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1997 मध्ये धर्मेंद्र यांना जीवनगौरव फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आय मिलन की बेला, फूल और पत्थर, मेरा गाव मेरा देश, यादों की बारात, रेशम की डोरी, नौकर बीवी का, आणि बेताब या त्यांच्या चित्रपटांना फिल्मफेअर नामांकन मिळाले.
एकाच वर्षात अनेक हिट चित्रपट देण्याचा विक्रम
धर्मेंद्र हे एक असे अभिनेते आहेत ज्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट देण्याचा विक्रम आहे. १९७३ मध्ये त्यांनी आठ हिट चित्रपट दिले. १९८७ मध्ये त्यांनी नऊ हिट चित्रपट देऊन स्वतःचाच विक्रम मोडला. हा विक्रम कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याने अखंडपणे मोडला आहे.
३०० हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
धर्मेंद्र यांच्या नावावर ३०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रमही आहे. १९६० मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांना “ही-मॅन” असे टोपणनाव मिळाले. आता त्यांच्या या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.






